मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Parineeti Chopra: लग्नानंतर परिणीती चोप्राचा अभिनयाला रामराम? नव्या क्षेत्रात करणार करिअर

Parineeti Chopra: लग्नानंतर परिणीती चोप्राचा अभिनयाला रामराम? नव्या क्षेत्रात करणार करिअर

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 25, 2024 05:59 PM IST

Parineeti Chopra Video: अभिनेत्री परिणिती चोप्राने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवरुन तिने अभिनय क्षेत्राला रामराम ठोकल्याचे म्हटले जात आहे.

Parineeti Chopra
Parineeti Chopra

बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्राने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिच्या आजवरच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. काही दिवसांपूर्वी परिणितीने राजकिय नेते राघव चड्ढाशी विवाह केला. त्यानंतर तिचा मिशन रनीगंज चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली आहे. आता परिणितीने अभिनयाच्या करिअरला रामराम ठोकल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

परिणितीने नुकताच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने करिअरबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. परिणिती आता संगीत क्षेत्रात करिअर करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण या क्षेत्रात करिअर करत असताना ती अभिनयाच्या क्षेत्रात दिसणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
वाचा: लग्न करुन घरी परतत असताना बायको हरवली, आमिर खानच्या 'लापता लेडीज'चा ट्रेलर पाहिलात का?

परिणितीने शेअर केलेल्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत, “संगीत हे माझ्यासाठी नेहमीच आनंद देणारे माध्यम ठरले आहे. मी अनेक संगीतकारांना अनेक वर्षांपासून स्टेजवर परफॉर्म करताना पाहत आले आहे. आता मीही या जगाचा एक भाग होणार आहे. मी स्वतःला खूप नशीबवान समजते. माझ्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे” या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

परिणितीच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. त्यासोबतच बॉलिवूडमधील तिच्या मित्रमैत्रीणींनी या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. परिणितीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिचा मिशन रणीगंज हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. त्यानंतर आता परिणिती ‘चमकीला’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरु आहे.

WhatsApp channel