Aishwarya-Abhishek: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन बॉलिवूडमधील सर्वात लाडक्या जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांची जोडी बॉलिवूडच्या परफेक्ट कपलच्या यादीत गणली जाते. सध्या अभिषेक आणि ऐश्वर्या त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहेत. या दोघांच्या नात्यात दुरावा असल्याच्या अनेक बातम्या सोशल मीडियावर आल्या होत्या. नुकतेच अभिषेक आणि ऐश्वर्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात वेगळे पोहोचले होते. दोघांनाही वेगळं येताना बघून पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.
यानंतर, अभिषेक बच्चनने अचानक एक घटस्फोटाची पोस्ट लाईक केली, तेव्हा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, अभिनेत्याला ती घटस्फोटाची पोस्ट का आवडली हे स्पष्ट झाले नाही. अशातच अभिनेता आता त्याच्या नव्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आला आहे.
नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण येत असतानाच अभिषेक बच्चनने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. अभिषेकने जिओ सिनेमाच्या 'घुरचडी' चित्रपटाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत अभिनेत्याने चित्रपटाच्या टीमचे आभार मानले आहेत. पार्थ समथान, खुशाली कुमार, संजय दत्त आणि रवीना टंडन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात आई-मुलीच्या प्रेमात पडलेल्या बाप-लेकाची कहाणी आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना अभिषेकने लिहिले की, ‘धन्यवाद निधी आणि बिनॉय. तुमच्यासाठी आणि या नव्या प्रवासासाठी खूप उत्सुक आहे.’ अभिषेकने हा व्हिडीओ चित्रपटाच्या स्टारकास्टला ही टॅग केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर जबरदस्त आहे.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचा विवाह याच महिन्यात १२ जुलै रोजी झाला होता. अनंतने राधिका मर्चंटसोबत लग्न गाठ बांधली आहे. या लग्नाला देश-विदेशातील सर्व बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अभिषेक आपल्या संपूर्ण कुटुंबासह लग्नात सहभागी झाला होता. तर, ऐश्वर्या मुलगी आराध्या बच्चनसोबत एकटीच दिसली होती. या संपूर्ण लग्नात ऐश्वर्या बच्चन कुटुंबासोबत दिसली नाही. या लग्नानंतरच अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नात्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली. नुकताच दोघांचा एक फोटो समोर आला आहे, ज्यात हे कपल एकत्र खूप खुश दिसत आहे. अशा तऱ्हेने माध्यमांमध्ये सुरू असलेल्या सर्व गोष्टी केवळ अफवा असल्याचे म्हटले जात आहे.
संबंधित बातम्या