सध्या अनेक बॉलिवूड कलाकार हे मालदीवला जाण्यास विरोध करताना दिसत आहेत. या मागचे कारण म्हणजे मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे सुरु झाल्या. या एका घटनेमुळे मालदीवच्या पर्यटन क्षेत्रावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय कंपन्याही आता मालदीवच्या विरोधात उतरल्या आहेत. तसेच बॉलिवूड कलाकारही मालदीवला जाण्यास नकार देताना दिसत आहेत.
अभिनेत्री पूनम पांडेने तिचे मालदीवमधील शूट रद्द केले आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच तिने पोस्टमध्ये शूट लक्षद्वीपला करणार असल्याचे म्हटले आहे. पूनमने ही पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टॅग केली आहे.
वाचा: मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय! अभिनेते प्रशांत दामले असं का म्हणाले? वाचा...
पूनमने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हॅट्सअॅप चॅटचे काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. या स्क्रीनशॉटमध्ये एक व्यक्ती बोलत आहे की, पूनमजी नील सरांकडून कळाले की तुम्ही शूट शेड्युल रद्द करु इच्छीता. त्यावर पूनमने व्हॉइस मेसेज करुन रिप्लाय दिला आहे. त्यानंतर पुन्हा एक मेसेज आहे की मॅडम मी संपूर्ण क्रूचे तिकिट काढले आहे. हॉटेलची बुकींग देखील केली आहे. शेवटच्या क्षणी हे शक्य नाही. पूनमने पुन्हा यावर व्हॉइस मेसेजने रिप्लाय दिला आहे. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने एक दिवसाची वेळ मागितली आहे. या चॅटसोबतच पूनमने बिकिनीमधील एक फोटो शेअर केला आहे.
यापूर्वी अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान, जॉन अब्राहम, श्रद्धा कपूर, जान्हवी कपूर, सारा अली खान यांनी मादीवल वादावर प्रतिक्रिया दिली. सर्वांनी भारतातील पर्यटनाला पाठिंबा दिला. तसेच मालदीवच्या मंत्र्यांवर टीका केली.