मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Swara Bhaskar: स्वरा भास्करचा लग्नातील फोटो पाहून कंगनाने केले ट्वीट, म्हणाली...

Swara Bhaskar: स्वरा भास्करचा लग्नातील फोटो पाहून कंगनाने केले ट्वीट, म्हणाली...

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 17, 2023 12:19 PM IST

Kangana Ranut: सतत बॉलिवूडवर टीका करणाऱ्या कंगना रणौतने आता स्वरासाठी ट्वीट केले आहे. तिच्या या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

कंगना रणौत
कंगना रणौत (HT)

बॉलिवूडमधील बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून नेहमी कंगान रणौत व स्वरा भास्कर या ओळखल्या जातात. त्या सामाजिक विषयांवर परखडपणे त्यांचे मत मांडताता. त्यांना यासर्वामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र त्या कधीही ट्रोलिंगला जुमानत नाहीत. नुकताच स्वरा भास्कर ही विवाहबंधनात अडकली. त्यानंतर कंगनाने स्वरासाठी एक खास ट्वीट केले आहे.

स्वरा भास्करने ट्विटरवर लग्नातील फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. आता कंगनाने स्वराचे ट्वीट रिट्वीट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 'तुम्ही दोघे एकमेकांसोबत आनंदी दिसत आहात. लग्न हे मनापासून केले जाते. बाकी सगळ्या औपचारिकता असत' या आशयाचे ट्वीट कंगनाने केले आहे. तिच्या या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधले कारण कंगना फार कमी लोकांच्या आनंदता सहभागी होऊन सकारात्मक ट्वीट करते.
वाचा: लग्न करताच स्वरानं फहादसाठी केलेले जुने ट्वीट चर्चेत, 'भाईचा आत्मविश्वास...'

एम्बेड
एम्बेड (HT)

काय आहे स्वराने लग्नानंतरचे ट्वीट?
अनेकदा आपल्या जवळ किंवा अगदी सोबत असलेली गोष्ट आपण दूरवर कुठंतरी शोधत असतो. आम्ही देखील अशाच शोधात होतो, प्रेमाच्या. आधी आम्हाला आमच्यातली मैत्री गवसली आणि त्यातून मग आम्ही दोघे एकमेकांना सापडलो, असं तिनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. '@FahadZirarAhmad मी अंत:करणपूर्वक तुझं स्वागत करते. माझं हृदय सध्या गोंधळलेलं आहे, पण कसंही असलं तरी ते तुझं आहे, असंही स्वरानं फहादला टॅग करून म्हटलं आहे.

कोण आहे फहाद अहमद?
फहाद हा समाजवादी पक्षाच्या युवाजन सभेचा राज्याचा अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ता आहे. २०२० साली झालेल्या एका आंदोलनाच्या दरम्यान दोघांची भेट झाली होती.

IPL_Entry_Point

विभाग