
Malaik Arora Cryptic Post : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. प्रोफेशनल लाईफमध्ये मलायका आज उंची गाठत असली, तरी तिने वैयक्तिक आयुष्यात बरेच चढ-उतार पाहिले आहेत. अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायकाने अर्जुन कपूरला बराच काळ डेट केले होते. पण आता हे नातेही संपुष्टात आले आहे. अलीकडेच अर्जुन कपूरने स्वत: मलायकासोबतच्या ब्रेकअपला दुजोरा दिला आणि तो अजूनही सिंगल असल्याचे म्हटले. या दरम्यान, आता मलायकाने अशी पोस्ट केली आहे, ज्यानंतर सगळेच गोंधळलेले दिसत होते. या पोस्टमध्ये मलायकाने एक निर्णय घेतला आहे.
मलायका अरोराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहिले- 'नो' वेम्बर (नोव्हेंबर) हा असा काळ आहे, जेव्हा आपण आपली ऊर्जा नाहीशी करणाऱ्या लोकांना, ठिकाणांना आणि गोष्टींना 'नाही' म्हणण्यास सुरवात करू शकता.' हा कोट मलायकाने पोस्ट केला आहे. मलायकाने आता स्वतःसाठी एक नवी सीमा निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यात ती स्वत:ला अशा लोकांपासून दूर ठेवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मलायकाने यापूर्वी ३१ ऑक्टोबर रोजीही एक पोस्ट शेअर केली होती. या कोटमध्ये तिने लिहिलं होतं की, ‘जर कोणी एका सेकंदासाठीही एखाद्याच्या हृदयाला स्पर्श केला तर तो आयुष्यभर त्याच्या आत्म्याला स्पर्श करतो.’ नुकताच अर्जुन कपूर त्याच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये दिसला होता. यावेळी पापाराझींनी त्याला विचारले की, मलायका कशी आहे? यावर अभिनेता म्हणाला- ‘मी आता सिंगल आहे.’ यानंतर दोघांच्या ब्रेकअपच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले. मात्र, हे ऐकल्यानंतर चाहत्यांचे मन दु:खी झाले.
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपची अनेक महिन्यांपासून चर्चा होती. दोघांनीही एकमेकांच्या वाढदिवशी एकही पोस्ट शेअर केली नाही, ज्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या आणखीनच चर्चेत आल्या होत्या. ‘सिंघम अगेन’च्या या अभिनेत्याने एका दिवाळी पार्टीला हजेरी लावली, जिथे त्याने पापाराझींना स्पष्टपणे सांगितले की, तो आता सिंगल आहे. अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोराने अर्जुन कपूरला डेट करण्यास सुरुवात केली. ती अभिनेत्यापेक्षा १३ वर्षांनी मोठी आहे. वयातील अंतरामुळे दोघांनाही खूप ट्रोलिंग सहन करावे लागले, पण ६ वर्षे ते एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि खुलेपणाने प्रेम व्यक्त करत राहिले. मात्र, अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ते वेगळे झाले आहेत. त्यांच्या ब्रेकअपचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
संबंधित बातम्या
