प्रेग्नेंसीमुळे ट्रोल झाल्यानंतर दीपिका पदुकोणने शेअर केला बेबी बंपचा पहिला फोटो; अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर मातृत्वाचं तेज
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  प्रेग्नेंसीमुळे ट्रोल झाल्यानंतर दीपिका पदुकोणने शेअर केला बेबी बंपचा पहिला फोटो; अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर मातृत्वाचं तेज

प्रेग्नेंसीमुळे ट्रोल झाल्यानंतर दीपिका पदुकोणने शेअर केला बेबी बंपचा पहिला फोटो; अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर मातृत्वाचं तेज

Jun 20, 2024 08:30 AM IST

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह काही महिन्यांत आई-वडील होणार आहेत. आता या दरम्यान अभिनेत्रीने बेबी बंपचा एक फोटो शेअर केला आहे.

दीपिका पदुकोणने शेअर केला बेबी बंपचा पहिला फोटो
दीपिका पदुकोणने शेअर केला बेबी बंपचा पहिला फोटो

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या प्रेग्नंट असल्यामुळे आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांचा आनंद घेत आहे. दीपिकाने यादरम्यान तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत. पण, आतापर्यंत तिने बेबी बंपचे फोटो शेअर केले नव्हते. मात्र, आता अभिनेत्रीने बेबी बंप दाखवताना पहिला फोटो शेअर केला आहे. आधी दीपिकाने इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर केला आणि आता इन्स्टा पोस्टमध्ये तिने बेबी बंप दाखवला आहे. यातील एक फोटो धुसर असला, तरी बेबी बंप स्पष्ट दिसत आहे.

या फोटोमध्ये दीपिकाने ब्लॅक कलरचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला असून, त्यात तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. त्याचबरोबर तिने हसतानाचा एक फोटोही शेअर केला असून तिसऱ्या फोटोत ती हसताना आणि बेबी बंप पकडताना दिसत आहे. फोटो शेअर करत दीपिकाने लिहिलं की, ‘ठीक आहे... आता मला भूक लागली आहे.’

शत्रुघ्न सिन्हा सोनाक्षीच्या लग्नाला उपस्थित राहणार नाहीत? अखेर अभिनेत्याने सोडले मौन! म्हणाले…

चाहत्यांच्या क्युट कमेंट्स!

दीपिकाच्या फोटोंवर चाहत्यांना खूप क्यूट कमेंट्स येत आहेत. प्रत्येकजण तिच्या क्यूटनेस आणि बेबी बंपवर क्यूट कमेंट्स करत आहेत. तर, काही चाहते दीपिकासाठी कमेंट करत आहेत की, तिला आणि तिच्या बाळाला कुणाची नजर लागू नये. तर, काही जण दीपिकावर प्रेग्नेंसी ग्लो स्पष्ट दिसत असल्याचं लिहित आहेत. दीपिकाच्या पोस्टवर अशाच अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

दीपिका चित्रपटात झळकणार!

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आता लवकरच ‘कल्की २८९८ ए.डी.’ या चित्रपटात झळकणार असून, ती या चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये हजेरी लावत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता, जो सगळ्यांनाच खूप आवडला आहे. या चित्रपटात दीपिकासोबत अमिताभ बच्चन, प्रभास आणि कमल हासन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

याशिवाय ती ‘सिंघम अगेन’ या चित्रपटातही दिसणार आहे, ज्यात ती एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह, अजय देवगण, अक्षय कुमार, करिना कपूर खान आणि अर्जुन कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Whats_app_banner