माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राजकीय विश्वासह बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. ही बातमी समजताच बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'बिग बॉस १८'चं शूटिंग मध्येच थांबवून ताबडतोब वांद्रे येथील लिलावती हॉस्पिटलला रवाना झाला होता. दुसरीकडे, मृत्यूची बातमी मिळताच संजय दत्त रुग्णालयात पोहोचला होता. बाबा सिद्दीकी हे सलमान आणि संजय दत्त यांच्या खूप जवळचे होते. विशेष म्हणजे एका पार्टीत शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यात भांडण झाल्याची बातमी चर्चेत आली तेव्हा बाबा सिद्दीकीयांनी पुन्हा दोघांना मिठी मारून मैत्री केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानला रुग्णालयात न जाण्याचा सल्ला देण्यात आला होता, परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि आपले जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लीलावती रुग्णालयात रवाना झाले, जिथे बाबा सिद्दीकी यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या तीन हल्लेखोरांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. एक आरोपी अद्याप फरार आहे. बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर रात्री उशिरा शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते.
वाचा: दीपिकापेक्षा करीनाने घेतली जास्त फी, वाचा ‘सिंघम अगेन’मधील कलाकारांच्या मानधनाविषयी
वांद्रे पूर्वेकडील निर्मल नगरयेथील कोलगेट मैदानाजवळ ील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि आमदार जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दोन शूटर्सना ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. यातील एक आरोपी उत्तर प्रदेशचा आणि दुसरा हरयाणाचा आहे, तर तिसरा आरोपी घटनास्थळावरून पळून गेला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी वृत्तवाहिन्यांना सांगितले. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत असून फरार हल्लेखोराचा शोध सुरू आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली. तीन वेळा आमदार राहिलेल्या सिद्दीकी यांनी नुकताच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
संबंधित बातम्या