मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ...तेव्हा मी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला होता; अभिनेता गश्मीर महाजनी याचा पहिल्यांदाच खुलासा

...तेव्हा मी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला होता; अभिनेता गश्मीर महाजनी याचा पहिल्यांदाच खुलासा

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 08, 2024 08:51 AM IST

गश्मीर महाजनी याचं वैयक्तिक आयुष्य गेल्या काही महिन्यांपासून चांगलंच ढवळून निघालं आहे. गश्मीरचे वडील अर्थात अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर अभिनेत्याला खूप ट्रोल केलं गेलं होतं.

वडिलांच्या मृत्यूनंतर आईशी वाद झाले अन् मी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला होता! मराठी अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
वडिलांच्या मृत्यूनंतर आईशी वाद झाले अन् मी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला होता! मराठी अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

मराठी मनोरंजन विश्वातील ‘हँडसम हंक’ अशी ओळख मिळवणारा अभिनेता गश्मीर महाजनी नेहमीच काहीना काही कारणांमुळे चर्चेत असतो. मात्र, यावेळी त्याने एक धक्कादायक खुलासा करत सगळ्यांनाच मोठा शॉक दिला आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे अभिनेत्याचे चाहते चांगलेच काळजीत पडले आहेत. गश्मीर महाजनी याचं वैयक्तिक आयुष्य गेल्या काही महिन्यांपासून चांगलंच ढवळून निघालं आहे. गश्मीरचे वडील अर्थात अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर अभिनेत्याला खूप ट्रोल केलं गेलं होतं. वडिलांना एकटं ठेवल्याबद्दल अनेकांनी त्याला सुनावले होते. मात्र, गश्मीरने नेहमीच आपल्या चाहत्यांच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तरं दिली आणि सगळ्यांचे गैरसमज दूर केले. मात्र, आता या दरम्यान आपण आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता, असा खळबळजनक खुलासा गश्मीर महाजनी याने केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत गश्मीर महाजनी याने देखील मनोरंजन विश्वात आपली कारकीर्द सुरू केली. त्याने आजवर अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये तसेच चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने नेहमीच आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. अभिनयासोबतच तो त्याच्या बेधडक बोलण्यासाठी देखील ओळखला जातो. मात्र, आता त्याने आत्महत्येचा विचार करत होतो, असे म्हणत सगळ्यांनाच मोठा धक्का दिला आहे. नुकतीच गश्मीर महाजनी याने एका युट्युब वाहिनीला मुलाखत दिली. यात त्याने हा धक्कादायक खुलासा केला आहे.

‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम प्रसिद्ध अभिनेते इयान गेल्डर यांचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अयशस्वी

काय म्हणाला गश्मीर महाजनी?

याबद्दल बोलताना गश्मीर महाजनी म्हणाला की, वडिलांच्या म्हणजेच रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूनंतर आमच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या घटनेनंतर एका अतिशय खडतर काळाला आम्ही सगळेच सामोरे गेलो. याच दरम्यान, त्याच्या मनात स्वतःचं आयुष्य संपवण्याचा विचार आल्याचं त्याने म्हटलं. गश्मीर महाजनी म्हणाला की, ‘बाबांच्या निधनाच्या दोन आठवड्यांनी माझ्यात आणि आईमध्ये बरेच मोठे वाद झाले. त्यावेळी मलाही खूप राग आला होता. त्याक्षणी माझ्या मनात आत्महत्येचा विचार आला होता. पण, त्यावेळी माझा मुलगा शेजारच्या बेडरूममध्ये झोपला होता. त्यावेळेस मला त्याचा विचार आला नसता, तर सगळं संपलं असतं.’

तर मी आयुष्य संपवलं असतं!

या प्रसंगाबद्दल सांगताना गश्मीर पुढे म्हणाला की, ‘आईबरोबर वाद झाल्यानंतर मी रागाने टेरेसवर निघून गेलो. मला राग सहन होत नव्हता आणि डोक्यातून विचार जात नवते. म्हणून मी जीव देण्याचा निर्णय घेतला. पण, त्याचक्षणी मला माझ्या मुलाचा विचार मनात आहे. माझा मुलगा ५ वर्षांचा आहे. त्याला वाढवण्याची जबाबदारी ही माझी आहे. त्यावेळी त्याचा विचार आला नसता तर मी माझं आयुष्य संपवलं असतं. असे विचार माझ्या मनात पहिल्यांदाच आले होते आणि मी ते कुणालाही सांगू शकत नव्हतो.’

IPL_Entry_Point