लोकप्रिय अॅडल्ट फिल्म स्टार थानिया फिल्ड्सने निधन झाले आहे. वयाच्या २४व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. थानियाचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.
थानिया फिल्ड्स ही पेरु देशातील अतिशय प्रसिद्ध अॅडल्ट फिल्म स्टार होती. ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असायची. तिच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. वयाच्या २४व्या वर्षी थानियाने इतक्या टोकाचा निर्णय का घेतला? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: शेतकरी एक ब्रॅण्ड म्हणून जन्माला येणारे!; 'नवरदेव (Bsc Agri)’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
काही दिवसांपूर्वी थानियाने तिच्यासोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर जवळपास एक महिन्यामध्ये थानियाचा मृत्यू झाला आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या अॅडल्ट फिल्म स्टारपैकी थानिया एक आहे. थानिया ही पेरु देशातील लोकप्रिय कलाकार आहे. पेरु येथील सिनेविश्वात तिने चांगलीच ओळख मिळवली आहे. अल्पावधीत पेरु येथील इंडस्ट्रीत ओळख मिळवणाऱ्यांमध्ये थानियाचा समावेश होतो.
थानियाचा सहकारी अलेझांड्रा स्वीटने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला श्रद्धांजली वाहिली आहे. त्याच्या या पोस्टनंतर थानियाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पोस्टमध्ये त्याने "थानियाच्या निधनाची बातमी खरी आहे. यासंदर्भात अधिक माहिती मी देऊ शकत नाही. पण तिच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे" असे म्हटले आहे.