Adult Star Sophia Leone: अडल्ट फिल्म स्टार सोफिया लिओनीचे निधन झाले आहे. वयाच्या २६व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. समोर आलेल्या माहितीनुसार, आठवडाभरापूर्वी तिचा मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सोफियाच्या कुटुंबीयांनी फोनवर तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर घराची तपासणी करताच तिच्या मृतदेह अढळला. सोफियाचे सावत्र वडील माईक रोमेरो यांनी सोफियाच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. सोफियाच्या मृत्यूचा सध्या तपास सुरु आहे.
वाचा: रुचिरा जाधव म्हणते 'राजा येईल गं', काय आहे नेमकी भानगड?
सोफिया मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सक्रिय होती. तिने काही पोस्ट शेअर केल्या होत्या. याविषयी माहिती देताना सोफियाच्या सावत्र वडिल म्हणाले की, "सोफियाच्या आई आणि कुटुंबाच्या वतीने, मला आमच्या प्रिय सोफियाच्या निधनाची बातमी तुम्हा सर्वांना सांगायची आहे. सोफियाच्या आकस्मिक मृत्यूने तिच्या कुटुंबावर आणि मित्रांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे."
वाचा: प्रियांका चोप्राची बहीण होणार केजरीवालांची सून होणार; लग्नपत्रिकेची जोरदार चर्चा
पुढे ते म्हणाले की, "१ मार्च २०२४ रोजी सोफियाचे कुटुंब तिच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते पण त्याला ती प्रतिसाद देत नव्हती. सोफियाच्या मृत्यूचा तपास सध्या स्थानिक पोलिसांकडून करत आहेत. सोफिया ही एक चांगली मुलगी, बहीण, नात, भाची आणि मैत्रिणी होती. तिला प्राण्यांची आवड होती. तसेच तिला फिरायला आवडायचे."
वाचा: तो डुकरासारखा खातो… सलमानविषयी अभिनेत्यानं केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा
गेल्या काही दिवसांपासून अडल्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये कलाकारांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. सोफियापूर्वी कागनी लीनचे वयाच्या ३६व्या वर्षी निधन झाले होते. समोर आलेल्या माहितीनुसार, कागनीने आत्महत्या केली. तसेच जानेवारी महिन्यात जेसी झेन प्रियकर ब्रेट हसनम्युलरसह ओक्लाहोमामध्ये मृतावस्थेत आढळली.
संबंधित बातम्या