मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kagney Linn Karter : ३६ वर्षीय ॲडल्ट फिल्म अभिनेत्रीची आत्महत्या, अंत्यसंस्कारासाठी मित्र मागताहेत मदत

Kagney Linn Karter : ३६ वर्षीय ॲडल्ट फिल्म अभिनेत्रीची आत्महत्या, अंत्यसंस्कारासाठी मित्र मागताहेत मदत

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 20, 2024 09:05 PM IST

Adult Star Kagney Linn Karter Died : ॲडल्ट फिल्म स्टार काग्नी लिन कार्टर हिचे निधन झाले आहे. वयाच्या ३६ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला.

Kagney Linn Karter
Kagney Linn Karter

Kagney Linn Karter Died: प्रसिद्ध ॲडल्ट फिल्म स्टार काग्नी लिन कार्टर हिचे निधन झाले आहे. वयाच्या ३६ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. तिने मागील आठवड्यात अमेरिकेतील ओहियो येथे अंतिम श्वास घेतला. टीएमझेडच्या रिपोर्टनुसार कॅग्नी लिन कार्टरने आत्महत्या केली आहे. कुयाहोगा काउंटी मेडिकल लॅबच्या कार्यालयाने गुरुवारी पर्मा शहरातील एका घरातून तिचा मृतदेह ताब्यात घेतला. 

ओहियो शहरातील पोलिसांनी सांगितले की, काग्नीने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. काग्नीच्या अंतिम संस्कारासाठी आर्थिक मदत मिळवण्यासाठी तिच्या मित्रांनी एक GoFundMe पेज तयार केले आहे. त्या पेजवर तिला सुंदर आत्मा संबोधले आहे. तिच्यावर अनेक लोक प्रेम करत होते. 

रिपोर्टनुसार, ३६ वर्षीय काग्नी हिने सुसाइड केली आहे. पोर्टलवर छापलेल्या  रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, काग्नीने गुरुवारी आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. काग्नीच्या मित्रांनी हार्ट ब्रेकिंग सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तिच्या मृत्यूची माहिती दिली आहे. यशस्वी असूनही काग्नी मानसिक आरोग्याच्या समस्येने त्रस्त होती.

मित्रांनी मागितली मदत -

पोस्टमध्ये लिहिले आहे की, अचीवमेंट्स आणि टॅलेंटेड असूनही काग्नी गेल्या अनेक वर्षापासून मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त होती. मित्राच्या मृत्यूनंतर मेंटल हेल्थ इश्यूबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी काग्नीच्या मित्रांनी सोशल मीडियावर एक मोहीम चालवली आहे. त्याचबरोबर तिच्या मित्रांनी काग्नीच्या आईला आर्थिक मदत देण्याचे लोकांना आवाहन केले आहे. जेणेकरून ती आपल्या मुलीवर अंतिम संस्कार करू शकेल.

त्यांनी म्हटले की, या फंडातून अंत्यसंस्कार करून जितके पैसे उरतील ते ॲनिमल रेस्क्यू सहाय्यता निधीसाठी दिले जातील. फंड पेजचे नाव GoFundMe असे आहे.

कोण होती काग्नी लिन कार्टर? 
मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार ३६ वर्षीय काग्नी एक परफॉर्मर, सिंगर, डांसर तसेच एक चांगली मुलगी व मैत्रिण होती. तिने २००० मध्ये  ॲडल्ट फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू केला होता. तिने आपल्या टॅलेंटवर अनेक प्रेस्टीजियस AVN अवॉर्ड जिंकले होते. मात्र २०१९ मध्ये फॅशन पोल डांसिंग फॉलो करण्याचा निर्णय घेतला होता. ॲडल्ट फिल्म इंडस्ट्री सोडून ती पोल डांसिंगचा स्टूडियो सुरू करणार होती. मात्र त्यापूर्वीच तिने जागाचा निरोप घेतला.

IPL_Entry_Point

विभाग