Adnan Sami Birthday Special: बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार म्हणून ओळखला जाणारा अदनान सामी हा कायमच चर्चेत असतो. अदनाने बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. त्याची 'तेरा चेहरा' आणि 'लिफ्ट करा दे' ही गाणी विशेष गाजली. त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. पण तो कधीही खचून गेला नाही. करिअरसोबतच अदनान सतत त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. आज १५ ऑगस्ट रोजी अदनानचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या आयुष्याविषयी काही खास गोष्टी...
अदनानचा जन्म १५ ऑगस्ट रोजी पाकीस्तानमध्ये अरशद सामी खान आणि नौरीन यांच्या कुटूंबात झाला. त्याचे वडील पाकिस्तानी लष्करात स्क्वाड्रन लीडर पदावर होते. १९६५ मध्ये भारत-पाक युद्धात फ्लाइट लेफ्टनंट म्हणून त्यांनी कामगिरी बजावली. अदनान फक्त गाण्यांसाठीच नव्हे तर त्याच्या यशस्वी शरीर ट्रान्सफॉर्मशन जर्नीसाठी देखील ओळखला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का वयाच्या १०व्या वर्षी अदनाला गायिका आशा भोसले यांनी सल्ला दिला होता आणि तो सल्ला अदनानच्या कामी आला.
अदनान सामी जेव्हा १० वर्षाचा होता, त्यावेळी आर.डी. बर्मन यांच्या एका कॉन्सर्टमध्ये बॉलिवूड गायिका आशा भोसले यांच्यासोबत त्याची भेट झाली होती. अदनानला लहानपणापासून संगीतात रस होता. पियानोवादनात तर त्याची बोटंही कोणी धरू शकणार नाही. त्याचे हे टॅलेंट पाहून गायिका आशा भोसले यांनी संगीत क्षेत्रातच करिअर करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. त्यानंतर २००० साली रिलीज झालेल्या ‘लकी’ चित्रपटातून ‘कभी तो नजर मिलाओ’ गाणे गात अदनानने सगळ्यांवर जादू केली. विशेष म्हणजे याच गाण्यात अदनान सामी यांच्यासोबत गायिका आशा भोसले यांनीही आवाज दिला. या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये यशस्वी संगीतकार म्हणून स्वत:चा ठसाही उमटवला.
अदनानने १९९३ मध्ये जेबा बख्तियारशी लग्न केले. अदनानला जेबापासून एक मुलगा आहे ज्याचे नाव त्याने अजान सामी खान ठेवले आहे. त्याने लग्नाच्या ३ वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला. सामी पुन्हा सिंगल झाला पण २००१ मध्ये दुबईच्या अरब सबाह गलदारीसोबत त्याचे नाव जोडले गेले. अदनान आणि सबा या दोघांचे हे दुसरे लग्न होते. अदनानप्रमाणेच सबालाही पहिल्या लग्नापासून एक मुलगा होता. परंतु, हे लग्नही फार काळ टिकले नाही आणि दीड वर्षातच हे लग्न देखील तुटले. दोघांचा घटस्फोट झाला आणि अदनान सामी पुन्हा एकदा आयुष्याच्या प्रवासात एकटा पडला.
वाचा: शाहरुख, आमीर आणि सलमान खानच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची कंगनाची इच्छा, म्हणाली 'दाखवून देईन...'
अदनानच्या वैयक्तिक आयुष्यात पुन्हा एक वळण आले जेव्हा २००८ मध्ये त्याने पुन्हा एकदा सबासोबत लग्न केले, जिच्यापासून त्याने पहिल्यांदा घटस्फोट घेतला होता. सबा मुंबईत आली, दोघे एकत्र राहू लागले, त्यांनी पुन्हा लग्न केले. पण वर्षभरानंतर दोघांनी पुन्हा घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. सबाने घटस्फोटासाठी अर्ज केला आणि दोघे वेगळे झाले. २०१० मध्ये अदनान सामीने रोया सामी खानशी लग्न केले. रोया एका निवृत्त मुत्सद्दी आणि लष्करी जनरलची मुलगी आहे. रोयासोबत त्याची पहिली भेट २०१० मध्ये झाली आणि काही काळानंतर अदनानने तिला प्रपोज केले. या लग्नापासून त्यांना एक मुलगी झाली, तिचे नाव त्यांनी मदिना सामी खान ठेवले.