मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  तू तो नाहीसच! अदनान सामीचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मशन पाहून चाहते चक्रावले
अदनान सामी
अदनान सामी

तू तो नाहीसच! अदनान सामीचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मशन पाहून चाहते चक्रावले

25 June 2022, 16:55 ISTPayal Shekhar Naik

(adnan sami)काही वर्षांपूर्वी त्याने त्याचं वजन कमी केलं होतं. तेव्हाही त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनची बरीच चर्चा झाली होती. मात्र आताचा अदनान पाहून त्याला ओळखणं देखील कठीण झालं आहे.

आपल्या बेधुंद आवाजाने प्रेक्षकांना मोहिनी घालणारा लोकप्रिय बॉलिवूड गायक अदनान सामी (adnan sami) सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. अदनानने त्याचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत जे पाहून नेटकरी देखील चकित झाले आहेत. अदनानने स्वतःचं वजन कमी केलं आहे. आणि त्याचं हे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते चक्रावले आहेत. काही वर्षांपूर्वी त्याने त्याचं वजन कमी केलं होतं. तेव्हाही त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनची बरीच चर्चा झाली होती. मात्र आताचा अदनान पाहून त्याला ओळखणं देखील कठीण झालं आहे. त्याच्या फोटोंवर नेटकरी तू अदनान नाहीसच अशा प्रतिक्रिया देत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

अदनान नुकताच त्याच्या कुटुंबासोबत मालदीव येथे सुट्ट्या घालवण्यासाठी गेला आहे. तिथले काही फोटो त्याने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो खूप बारीक दिसत आहे. त्याने वजन कमी करण्यासाठी स्वतःवर घेतलेली मेहनत फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहे. आधीचा अदनान आणि आताचा अदनान यांच्यात खूप मोठा फरक आहे. त्यामुळेच त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड वेगाने वायरल होत आहेत. चाहत्यांना तर आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेनासा झालाय.

त्याच्या फोटोंवर चाहतेही निरनिराळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका युझरने कमेंट करत लिहिलं, 'अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन' दुसऱ्या युझरने लिहिलं, 'हे सगळं खातोयस तरीही वजन कसं कमी होतंय तुझं तेच कळत नाहीये.' आणखी एका युझरने लिहिलं, 'भाई तू अदनान सामी नाहीयेस.' तर काही युझर्स या फोटोंना एडिटिंग केली असल्याचा दावा करत आहेत.

विभाग