गरोदरपणात अभिनेत्रीला लागले होते बिअर पिण्याचे डोहाळे! जाणून घ्या ही अभिनेत्री आहे तरी कोण?-aditi sarangdhar talked about preganancy phase ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  गरोदरपणात अभिनेत्रीला लागले होते बिअर पिण्याचे डोहाळे! जाणून घ्या ही अभिनेत्री आहे तरी कोण?

गरोदरपणात अभिनेत्रीला लागले होते बिअर पिण्याचे डोहाळे! जाणून घ्या ही अभिनेत्री आहे तरी कोण?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 08, 2024 10:20 AM IST

नुकत्याच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने गरोदरपणातील काही किस्से शेअर केले आहेत. त्यामध्ये तिने बिअर पिण्याचे डोहाळे लागल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता तिच्याविषयी जोरदार चर्चा रंगली आहे.

Aditi Sarangdhar: अभिनेत्रीला लागले होते बिअर पिण्याचे डोहाळे
Aditi Sarangdhar: अभिनेत्रीला लागले होते बिअर पिण्याचे डोहाळे

अभिनेत्रींच्या गरोदरपणाविषयी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्या गरोदरपणात काय खातात? कोणते कपडे घालतात? हे चाहत्यांना नेहमीच जाणून घ्यायचे असते. पण एका मराठमोळ्या अभिनेत्रीला गरोदरपणात बिअरचे डोहाळे लागले होते. तिने स्वत: हा किस्सा सांगितला आहे. त्यामुळे आता या अभिनेत्रीची जोरदार चर्चा रंगली आहे.

सध्या सगळीकडे चर्चा सुरु असलेली ही अभिनेत्री दुसरीतिसरी कोणी नसून आदिती सारंगधर आहे. तिने नुकताच आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने गरोदरपणातील काही किस्से सांगितले आहेत. दरम्यान, आदिवतीने गरोदरपणात बिअर पिण्याचे डोहाळे लागल्याचे सांगितले. तसेच डॉक्टरांनी देखील त्यासाठी परवानगी दिली असल्याचे आदिती म्हणाली. आदिताचा हा किस्सा सध्या चांगलाच गाजत आहे. तिच्या या मुलाखतीच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
वाचा: अमिताभ हे रेखासोबत काम करु शकतात का? जया बच्चन यांनी दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

काय म्हणाली आदिती?

माझ्या गरोदरपणाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मी खूप उत्साहित होते. तेव्हा मला बिअर प्यायचे डोहाळे लागले होते. मग डॉक्टरांना विचारुन मी गरोदरपणात बिअर प्यायला लागले. मी तेव्हा इंडियन फूड खाल्लेच नाही. मी सलाड खायचे आणि बिअर प्यायचे. मी डॉक्टरांना विचारले होते की, मी काय करु बिअर नाही प्यायले तर मला कसे तरी होते. मला राग यायला लागतो. मग त्या म्हणाल्या की, घ्या दोन - दोन सीप घेत जा. मग मी नऊ महिने बिअर प्यायचे. भात आणि फोडणी वैगरे आली ना त्यातली एक एक मोहरी अशी काढून बाजूला सारायचे. घरभर जेवणातील मोहरी पडलेली असायची. त्यामुळे मी इंडियन फूडच बंद केले होते. मग मी नऊ महिने सॅलड आणि बिअरच घेतली होती असे आदिती म्हणाली.
वाचा: 'आई कुठे काय करते' मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्याची एण्ट्री, चाहत्यांनी व्यक्त केला आनंद

आदितीच्या कामाविषयी

आदिती सारंग 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत होती. तिने शाल्वच्या बहिणीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. तसेच तिचे मास्टर माईंड हे नाटक देखील गाजत आहे. तसेच तिचा 'बाई गं' हा चित्रपट येणार आहे.
वाचा: कलाला कळाली आई-वडिलांची बिकट परिस्थिती, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आजच्या भागात काय घडणार?