बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ यांनी सप्टेंबरमध्ये लग्न केल्याची माहिती समोर आली होती. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीतल तेलंगणातील श्री रंगनायकस्वामी मंदिरात दोघांनी विवाह केला होता. सोशल मीडियावर लग्नातील फोटो शेअर करत या कपलने माहिती दिली होती. आता पुन्हा एकदा अदिती आणि सिद्धार्थने लग्न केल्याचे समोर आले आहे. त्यांनी राजस्थानमध्ये दुसऱ्यांदा विवाह केला आहे. या विवाहसोहळ्याचे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
अदिती राव हैदरीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर दुसऱ्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अदितीने लाल रंगाचा लेहंगा परिधान केल्याचे दिसत आहे. त्यावर तिने ज्वेलरी घातली आहे. या लूकमध्ये अदिती अतिशय सुंदर दिसत आहे. तर सिद्धार्थने मोती रंगाची शेरवानी घातली आहे. त्यावर गळ्यात मोत्याची माळ घातली आहे. या फोटोंमध्ये तो अतिशय हँडसम दिसत आहे. सोशल मीडियावर अदिती आणि सिद्धार्थच्या दुसऱ्या लग्नातील हे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.
अदितीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर करत, 'एकमेकांच्या आयुष्यात जीवनभर कवटाळून ठेवावी अशी गोष्ट' या आशयाचे कॅप्शन दिले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. 'अदितीचा साधेपणा आवडणारा आहे', 'दोघेही एकमेकांसोबत सुंदर दिसत आहे', 'ते एकमेकांसाठीच बनले आहेत', 'दोघांनाही पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा' अशा अनेक कमेंट त्यांच्या फोटोवर पाहायला मिळत आहेत.
वाचा: अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांच्या वयात किती अंतर आहे? जाणून घ्या या जोडप्याविषयी
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडी या वेब सीरिजचा भाग असलेली अदिती राव हैदरीची सिद्धार्थशी पहिली भेट २०२१ मध्ये एका तेलुगू चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. महासमुद्रम नावाच्या या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एकमेकांच्या नजरा जुळल्या. ते सुरुवातीला एकमेकांचे मित्र होते. त्यानंतर हळूहळू त्यांच्या मैत्रिचे प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर २०२३मध्ये त्यांची लव्हलाइफ समोर आली. त्यांचा एकत्र डान्स करतानाचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी अदितीने लग्नातील फोटो शेअर करत सर्वांना चकीत केले होते. अतिशय खासगी पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी राजस्थानमध्ये लग्न केल्याचे समोर आले आहे.