बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी जवळपास तीन वर्ष बॉयफ्रेंड सिद्धार्थला डेट केल्यानंतर आज लग्न बंधनात अडकली आहे. अदिती आणि सिद्धार्थ २०२१ पासून एकमेकांना डेट करत होते आणि आता तेलंगणातील श्री रंगनायकस्वामी मंदिरात दोघांनी विवाह केला आहे. या जोडप्याने सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या चाहत्यांना याबाबत माहिती दिली. चाहत्यासोबत काही कलाकारांनी देखील या कपलवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अदितीने लग्नाचे हे खास फोटो शेअर करत दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने 'तू माझा सूर्य, माझा चंद्र आणि तारा आहेस... एकेकांचे आयुष्यभर सोबती होण्यापासून हसण्यासाठी, कधीही मोठं न होण्यासाठी... शाश्वत प्रेम, प्रकाश आणि जादू मिसेस आणि मिस्टर अदू-सिद्धू' या आशयाचे कॅप्शन दिले आहे. सिद्धार्थ आणि अदितीने काही जवळच्या मोजक्याच लोकांसोबत लग्न केले आहे. त्यांच्या लग्नातील फोटो पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडी या वेब सीरिजचा भाग असलेली अदिती राव हैदरीची सिद्धार्थशी पहिली भेट २०२१ मध्ये एका तेलुगू चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. महासमुद्रम नावाच्या या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एकमेकांच्या नजरा जुळल्या. ते सुरुवातीला एकमेकांचे मित्र होते. त्यानंतर हळूहळू त्यांच्या मैत्रिचे प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर २०२३मध्ये त्यांची लव्हलाइफ समोर आली. त्यांचा एकत्र डान्स करतानाचा व्हिडीओ समोर आला होता.
वाचा: इंटिमेट सीनसाठी दारू पाजली अन् बलात्कार केला; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टनुसार, अदिती राव हैदरीचा जन्म २८ ऑक्टोबर १९८६ रोजी हैदराबाद, आंध्र प्रदेश येथे झाला. बॉलिवूडची क्यूट दिवा फक्त ३७ वर्षांची आहे. सिद्धार्थचा जन्म १७ एप्रिल १९७९ रोजी चेन्नईत झाला. जोडप्याच्या वयात जवळपास ७ वर्षांचा फरक आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंच्या जोडीदारांमध्ये वयात अंतर आहे. पण दोघांच्या वैयक्तिक आयुष्यात किती समन्वय आहे हे महत्त्वाचे आहे. आता अदिती आणि सिद्धार्थने लग्न केल्यावर चाहत्यांना आनंद झाला आहे. अनेकांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.