सेलिब्रेटी जेव्हा लग्न करतात तेव्हा त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होते. लग्नाचा सेट, आलेले पाहूणे, वर-वधूचा लकू पाहण्यासाठी उत्सुक असलेले चाहते या सर्व गोष्टी नेहमीच कलाकारांच्या लग्नात पाहिल्या जातात. कडक सुरक्षेसह 'नो फोटो' धोरण लागू करुन दिवसभर लग्नस्थळाबाहेर थांबलेल्या पॅपराझींची अधिकृत भेट घेऊन लूक वर-वधू आपला लूक दाखवतात. पण या सगळ्याला अदिती आणि सिद्धार्थ अपवाद ठरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अदिती राव हैदरीच्या लग्नाची चर्चा रंगील आहे. आता अदितीच्या लग्नातील पहिला फोटो समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ हे गेल्या काही दिवसांपासून लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. आता अदितीने लग्नातील फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्काच दिला आहे. आजचा दिवस हा दोघांसाठीही एकदम खास असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अदितीने लग्नासाठी गोल्डन रंगाची साडी नेसली आहे. त्यावर साजेशी ज्वेलरी घातली आहे. या लूकमध्ये अदिती अतिशय सुंदर दिसत आहे. तर दुसरीकडे सिद्धार्थने पांढऱ्या रंगाचा झब्बा कुर्ता घातला आहे. दोघेही वर आणि वधूच्या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत. सोशल मीडियावर दोघांचे हे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.
अदितीने लग्नाचे हे खास फोटो शेअर करत दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने 'तू माझा सूर्य, माझा चंद्र आणि तारा आहेस... एकेकांचे आयुष्यभर सोबती होण्यापासून हसण्यासाठी, कधीही मोठं न होण्यासाठी... शाश्वत प्रेम, प्रकाश आणि जादू मिसेस आणि मिस्टर अदू-सिद्धू' या आशयाचे कॅप्शन दिले आहे. सिद्धार्थ आणि अदितीने काही जवळच्या मोजक्याच लोकांसोबत लग्न केले आहे. त्यांच्या लग्नातील फोटो पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
वाचा: 'बिग बॉस मराठी'साठी अभिजीत-निक्कीने घेतले लाखो रुपये, सूरज चव्हाणला आठवड्याला किती मिळते फी?
नेटकऱ्यांसोबतच कलाकरांनी देखील अदिती आणि सिद्धार्थला त्यांच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री अनन्या पांडेने कमेंट करत, "खूप सुंदर! अभिनंदन" असे म्हटले आहे. तर सयानी गुप्ता यांनी, "सुंदर! लव्हबर्ड्सचे अभिनंदन!” अशी कमेंट केली आहे. एका यूजरने कमेंट करत अदिती आणि सिद्धार्थचे कौतुक केले आहे. 'सर्व गोष्टी खासगी ठेवण्याचे एक उत्तम उदाहरण' अशी कमेंट केली आहे.
संबंधित बातम्या