मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने गुपचूप केले लग्न?

आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने गुपचूप केले लग्न?

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 27, 2024 03:26 PM IST

गेल्या काही दिवसांपासून आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ हे एकमेकांना डेट करत आहेत. आता त्यांनी गुपचूप लग्न केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहित समोर आलेली नाही.

आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने गुपचूप केले लग्नबंधन?
आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने गुपचूप केले लग्नबंधन?

बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबत वेळ घालवतानाचे फोटो शेअर करतात. आता आदिती आणि सिद्धार्थने गुपचूप लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

बॉलिवूडमध्ये सध्या वेडिंग सिझन सुरु असल्याचे दिसत आहे. एकापाठोपाठ एक असे कलाकार विवाह बंधनात अडकताना दिसत आहेत. काही कलाकार हे मोठ्या थाटामाटात सर्वांच्या उपस्थित कोट्यवधी रुपये खर्च करुन लग्न करत आहेत. तर काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत गुपचूप लग्न उरकत आहेत. समोर आलेल्या रिपोर्ट्स नुसार, आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांनी एका मंदिरात गुपचूप लग्न केले आहे.
वाचा: कौतुकास्पद! रितेश देशमुखची मुले फुटबॉल खेळण्यासाठी परदेशात

तेलंगणा येथील वनपार्थीमधील श्रीरंगपुर रंगनाथ स्वामी मंदिरात आदिती आणि सिद्धार्थ यांनी लग्न केले आहे. त्यांच्या लग्नसोहळ्याला काही मोजक्याच मंडळींनी हजेरी लावली. दोघांच्याही कुटुंबातील काही सदस्य आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत आदिती किंवा सिद्धार्थकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्या दोघांनी कोणताही फोटो शेअर केलेला नाही. पण चाहते मात्र आनंदी झाले आहेत.
वाचा: ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमासाठी प्रविण तरडेची खास पोस्ट

आदिती आणि सिद्धार्थ हे कायमच त्यांचे खासगी आयुष्य लाइमलाइटपासून दूर ठेवताना दिसले आहेत. त्यांनी कधीही मीडियासमोर प्रेमाची कबूली दिली नाही. दोघांनाही त्यांच्या नात्याविषयी सर्वगोष्टी खासगी ठेवणे पसंत होते. त्यामुळे त्यांच्या लग्नाविषयी फार कोणाला माहिती नव्हती.

अशी सुरु झाली आदिती आणि सिद्धार्थची लव्हस्टोरी

आदिती आणि सिद्धार्थची लव्हस्टोरी तेलुगू चित्रपट महा समुद्रमच्या वेळी २०२१मध्ये सुरु झाली. या चित्रपटात दोघेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसत होते. या चित्रपटाच्या सेटवर त्यांची ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली. हळूहळू दोघे एकमेकांना डेट करु लागले. काही दिवसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी प्रेमाची कबूली दिली. आता दोघे विवाहबंधनात अडकल्याचे म्हटले जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग