मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Adipurush: ‘जय श्रीराम’नंतर होणार ‘राम सिया राम’चा घोष; ‘आदिपुरुष’चं दुसरं गाणं या दिवशी होणार रिलीज!
Adipurush
Adipurush

Adipurush: ‘जय श्रीराम’नंतर होणार ‘राम सिया राम’चा घोष; ‘आदिपुरुष’चं दुसरं गाणं या दिवशी होणार रिलीज!

26 May 2023, 15:21 ISTHarshada Bhirvandekar

Ram Siya Ram Song: ‘जय श्रीराम’ या गाण्याच्या रिलीजनंतर आता टीम ‘आदिपुरुष’ पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे.

Ram Siya Ram Song: सध्या मनोरंजन विश्वात ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा बोलबाला आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी चित्रपटातील ‘जय श्रीराम’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आता टीम ‘आदिपुरुष’ पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘आदिपुरुष’ची टीम आपला बेंचमार्क उंचावत २९ मे २०२३ रोजी हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत असंख्य प्लॅटफॉर्मवर ‘राम सिया राम’ हे या चित्रपटातील दुसरे गाणे एका भव्य सोहळ्यात लॉन्च करणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मनोरंजन विश्वाची म्युझिकल जोडी ‘सचेत-परंपरा’ यांनी हे गाणे गायले आणि संगीतबद्ध केलेले आहे. त्याचबरोबर मनोज मुनताशीर यांनी हे गीत लिहिले आहे. असे हे अभूतपूर्व गाणे सर्व सीमारेषा ओलांडून जगभरातील प्रेक्षकांना मोहित करणार, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. चित्रपट चॅनेल, संगीत चॅनेल ते सामान्य मनोरंजन चॅनेल, संपूर्ण भारतात ७०+ पेक्षा अधिक आणि भारतभर पसरलेले रेडिओ स्टेशन, राष्ट्रीय वृत्त चॅनेल, मैदानी होर्डिंग, संगीत स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म, तिकीट भागीदार, चित्रपट थिएटर, व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आणि सर्व प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर २९ मे रोजी दुपारी १२ वाजता गाणे प्रदर्शित केले जाणार आहे.

Kailash Kher: शिस्त शिकून या! ‘खेलो इंडिया’च्या व्यवस्थापनावर भडकले कैलाश खेर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट टी-सिरीजचे भूषण कुमार आणि कृष्ण कुमार, आणि त्याचबरोबर ओम राऊत, प्रसाद सुतार आणि रेट्रोफिल्स मधील राजेश नायर यांनी निर्मित केला आहे. १६ जून २०२३ रोजी जागतिक स्तरावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट संस्कृत महाकाव्य रामायणावर आधारित आहे. या चित्रपटात ‘राघव’च्या भूमिकेत प्रभास, ‘जानकी’च्या भूमिकेत क्रिती सेनन आणि ‘लक्ष्मण’च्या भूमिकेत सनी सिंह दिसणार आहेत. या चित्रपटाबाबत सुरुवातीपासूनच अनेक वाद सुरू आहेत. मात्र, जेव्हा ‘आदिपुरुष’चा ट्रेलर रिलीज झाला, तेव्हा लोकांना तो खूप आवडला. चित्रपटाच्या दिग्दर्शकानेही पात्रांच्या लूकमध्ये आवश्यक ते बदल करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.

विभाग