मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  आदिनाथ कोठारेचा वाढदिवस पण पतीसाठी उर्मिलाने पोस्टही केली नाही, दोघात नेमकं काय बिनसलं?

आदिनाथ कोठारेचा वाढदिवस पण पतीसाठी उर्मिलाने पोस्टही केली नाही, दोघात नेमकं काय बिनसलं?

Aarti Vilas Borade HT Marathi
May 14, 2024 08:26 AM IST

अभिनेता आदिनाथ कोठारेचा १३ मे रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्त त्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या. मात्र, आदिनाथची पत्नी उर्मिला कोठारेने आदिनाथसाठी साधी एक पोस्टही केली नाहीये.

आदिनाथ कोठारेचा वाढदिवस
आदिनाथ कोठारेचा वाढदिवस

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक अशा दोन्ही भूमिका निभावणाा आदिनाथ कोठारे हा कायमच चर्चेत असते. १३ मे रोजी आदिनाथचा वाढदिवस होता. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आदिनाथला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण या सगळ्यामध्ये आदिनाथची बायको उर्मिला कोठारेने पतीसाठी एकही पोस्ट केलेली नाही. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आदिनाथ हा प्रसिद्ध अभिनेते महेश कोठारे यांचा मुलगा आहे. वडिलांच्या चित्रपटात काम करत आदिनाथने सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. आता आदिनाथही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहे. 'पाणी' हा आदिनाथने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
वाचा: 'रानू मंडल झालाय बिचारा', ट्रोल करणाऱ्या यूजर्सला अभिनेता गौरव मोरेचे सडेतोड उत्तर

उर्मिलाने पतीसाठी पोस्ट केलेली नाही

आदिनाथच्या ४०व्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. पण या सगळ्यांमध्ये आदिनाथची पत्नी उर्मिला कोठारेच्या पोस्टची सर्वजण वाट पाहात होते. उर्मिला काय पोस्ट करणार? असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र, उर्मिलाने सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट केलेली नाही. त्या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. असे नेमके काय झाले की उर्मिलाने आदिनाथला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या नाहीत.
वाचा: विकेंडला दिसला 'श्रीकांत' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा, तीन दिवसात सिनेमाने कमावले इतके कोटी

२०११ साली बांधली लग्नगाठ

आदिनाथ आणि उर्मिलाने २०११ मध्ये लग्नगाठ बांधली होती. तसेच या दोघांना जिजा नावाची एक गोंडस मुलगी देखील आहे. आदिनाथ आणि उर्मिला या दोघांनी अनवट यासारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यामुळे आदिनाथ आणि उर्मिलाची ऑफस्क्रिन जोडी जितकी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती, तितकीच त्यांची ऑनस्क्रिन जोडी देखील प्रेक्षकांच्या आवडीची ठरत होती. पण गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये अनबन सुरु असल्याचे म्हटले जात आहे. त्यातच उर्मिलाने आदिनाथला शुभेच्छा न दिल्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे.
वाचा: क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट! जान्हवी आणि राजकुमारच्या 'माही' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

आदिनाथच्या कामाविषयी

आदिनाथ लवकरच 'शक्तिमान' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री स्पृहा जोशी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट येत्या २४ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट असल्यामुळे सर्वांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता लागली आहे.

IPL_Entry_Point