Adil Khan Durrani With Tanushree Dutta: बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ अभिनेत्री राखी सावंत सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. राखी आणि तिचा पती आदिल खान दुर्राणी यांच्यातील वादांमुळे सध्या दोघेही प्रचंड प्रसिद्धी झोतात आहेत. मात्र, आता आदिल खान एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. आदिल खान दुर्राणी नुकताच अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्यासोबत स्पॉट झाला आहे. तनुश्री-आदिल यांनी एकत्र गणपतीचं दर्शन घेतलं आहे. दोघे एकत्र स्पॉट झाल्यामुळे आता सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता तिच्या चित्रपटांसोबतच मीटू चळवळीमुळे देखील खूप चर्चेत आली होती. ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत आणि तिचा पती आदिल दुर्राणी यांच्यातील वादामुळे सध्या तनुश्री दत्ताचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वीच तनुश्री दत्ताने आदिल दुर्राणीसोबत पत्रकार परिषद घेऊन राखी सावंतविरोधात आवाज उठवला होता. राखीबाबत अभिनेत्रीने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. तनुश्री दत्ता हिने आदिलच्या समर्थनात पुढे येऊन राखी सावंतवर निशाणा साधला होता.
दरम्यान, नुकतीच तनुश्री दत्ता आदिल दुर्राणीसोबत स्पॉट झाली होती. या प्रसंगाचा एक नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तनुश्री आणि आदिल गणपतीच्या दर्शनासाठी एकत्र गेल्याचे दिसले आहे. आदिल-तनुश्रीने या दोघांनी निखिल रुपारेल यांच्या घरातील गणपतीची दर्शन घेतल्याचे म्हटले जात आहे. तनुश्री दत्ता आणि आदिलच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. लवकरच हे दोघे मिळून राखीविरोधात मोठी कारवाई करू शकतात, असे म्हटले जात आहेत.
नुकतेच तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर त्यांच्यावर पुन्हा ताशेरे ओढले आहेत. यावेळी तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर आणि विवेक अग्निहोत्री यांच्यावर आपले करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला. ज्यांनी माझं करिअर उद्ध्वस्त केलं, ते लोक आज मजेत आयुष्य जगात आहेत, असं तनुश्री दत्ता म्हणाली. एकवेळ अशी होती, जेव्हा यांचे चित्रपट चालत नव्हते आणि ते चालावेत म्हणून माझ्याकडे गाणी घेऊन यायचे, असा आरोपही तनुश्री दत्ता हिने केला.
संबंधित बातम्या