पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील खेळांवर व त्यातील पदक विजेत्यांवर सर्वांची नजर आहे. नुकतेच तुर्कीचा शूटर यूसुफ डिकेक याने सिल्वर मेडल जिंकले. सिल्वर मेडल जिंकल्यानंतर यूसुफ डिकेक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान एक एक्स यूजरने यूसुफ डिकेक याला शुभेच्छा न देता त्याच्याऐवजी बॉलीवुड अभिनेते आदिल हुसैन यांचे अभिनंदन केले आहे. अभिनेत्यानेही एक्स यूजरला गंमतीशीर उत्तर दिले आहे. एक्स यूजरने चुकीने नाही तर जाणून-बुझून आदिल हुसैन यांचे अभिनंदन केले आहे.
पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत तुर्की नेमबाज युसूफ डिकेकऐवजी पदक जिंकल्याबद्दल आदिल यांचे अभिनंदन करण्यात आल्यानंतर त्यांना खूप गंमतीशीर वाटले.
या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "तुर्कीसाठी ऑलिम्पिक २०२४ मध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल सर @_AdilHussain यांचे अभिनंदन. रिसपेक्ट". या पोस्टमध्ये आदिल आणि युसूफचा फोटो कोलाज करण्यात आला होता, दोघांमधील साम्य दाखवण्यााचा हा प्रयत्न होता.
अभिनेते आदिल हुसेन यांनी म्हटले की, मला वाटत नाही की हे ट्विट गैरसमजातून केले गेले आहे. त्यांनी जाणीवपूर्वक केलेली ही गोष्ट होती. तो विनोदात बनवला गेला होता, त्यामुळे मला धक्का बसला नाही. मला हे खरोखर मजेदार आणि मनोरंजक वाटले".
आदिलने एक्स म्हटले की, "जर, हे खरे असते... कदाचित सराव सुरू करायला उशीर झालेला नाही... माझ्याकडे वृत्ती असल्याने मला आता कौशल्यावर काम करण्याची आवश्यकता आहे", त्याचबरोबर त्यांनी हसण्याची इमोजी टाकली आहे.
स्वत:मध्ये आणि अॅथलीटमध्ये काही साम्य दिसते का, असे विचारले असता आदिल म्हणाला, 'अजिबात नाही. पांढरे केस आणि चष्म्याची फ्रेम याव्यतिरिक्त काही साम्य आहे असे मला वाटत नाही.
तुर्कीचा नेमबाज युसूफ डिकेक सुवर्णपदकाच्या लढतीत सर्बियाकडून पराभूत झाला आणि त्याने रौप्यपदक पटकावले. मात्र, आभासी जगात तो रातोरात सेन्सेशन बनला. स्पर्धेत पदक जिंकल्यामुळे चर्चेत राहण्यापेक्षा त्याच्या शांत आणि संयमी वागण्याने लोकांनी त्याचे कौतुक केले. हेडवेअर, नियमित टी-शर्ट, प्रिस्क्रिप्शन चष्मा, ४.५ मिमी कॅलिबरची एअर गन आणि एक हात खिशात घालून तो मिश्र सांघिक १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भाग घेताना दिसला.
खरं तर युसूफने त्याच्या व्हायरल फेमवर प्रतिक्रिया दिली आहे. "मला कधीच विशेष उपकरणांची गरज भासली नाही. माझे मित्रही मला याबद्दल विचारतात. इतर व्यावसायिक नेमबाजही मला याबद्दल विचारतात आणि मी त्यांना सांगतो की मी फक्त एक नैसर्गिक नेमबाज आहे," असे ५१ वर्षीय नेमबाजाने तुर्कीच्या माध्यमांना सांगितले.