Sushant Singh Rajput House: 'मला एक वेगळी ऊर्जा जाणवते', सुशांत सिंह राजपुतच्या घरात राहणाऱ्या अदाने दिली प्रतिक्रिया
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sushant Singh Rajput House: 'मला एक वेगळी ऊर्जा जाणवते', सुशांत सिंह राजपुतच्या घरात राहणाऱ्या अदाने दिली प्रतिक्रिया

Sushant Singh Rajput House: 'मला एक वेगळी ऊर्जा जाणवते', सुशांत सिंह राजपुतच्या घरात राहणाऱ्या अदाने दिली प्रतिक्रिया

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 14, 2024 06:07 PM IST

Sushant Singh Rajput House: सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अभिनेत्री अदा शर्मा त्याच्या फ्लॅटमध्ये राहात आहे. ४ वर्ष रिकाम्या असलेल्या या फ्लॅटमध्ये राहताना अभिनेत्रीला कसे वाटते याविषयी तिने सांगितले आहे.

अदा शर्मा
अदा शर्मा

Sushant Singh Rajput House: 'द करेळ स्टोरी'मधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे अदा शर्मा. या चित्रपटाने अदाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. जेव्हा अदा शर्मा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या घरी शिफ्ट झाली तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या. तिला सुशांतच्या नावाने प्रसिद्धी हवी आहे, असंही काही लोकांनी म्हणत तिला ट्रोल केले होते. अदाला अनेकदा विचारले जाते की घरात तिला कसे वाटत आहे. त्यावर अदाने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाली अदा

अदाने नुकतीच इंडिया टुडे डिजिटलशी संवाद साधला. त्यावेळी तिला प्रसिद्धी मिळवण्यासाठी अदा सुशांतच्या घरात राहात आहे असे बोलले जात आहे. तसेच तुला ट्रोलही केले जात आहे त्यावर काय सांगशील असा प्रश्न विचारण्यात आला होता. ट्रोलिंगच्या प्रश्नाला उत्तर देताना अदा शर्मा म्हणाली, 'एक अभिनेत्री म्हणून किंवा माणूस म्हणून तुम्ही जे काही बोलले जात आहे त्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही. आयुष्यात करण्यासारखं बरंच काही असतं. हा स्वतंत्र देश आहे, प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. ज्यांना काही वाईट वाटत असेल तर त्यांनी विचार करत राहा. मी एक चांगला माणूस आहे हे मी कोणालाही सांगयची गरज नाही. मला जे करायचं होतं ते मी केलं. मी त्या घरात व्यवस्थित स्थायिक आहे आणि मला ती जागा आवडते.'

घरात एक वेगळी ऊर्जा जाणावते

याआधी एका मुलाखतीत तिने सुशांत सिंहबद्दल बोलण्यासारखं बरंच काही असल्याचं म्हटले होते. तसेच घरात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते असे अदा म्हणाली होती. त्या घरातील ऊर्जेचे ही तिने कौतुक केले आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर जवळपास ४ वर्षे त्याचा फ्लॅट रिकामा होता. आता अदा शिफ्ट झाली आहे. ती अनेकदा घराचे फोटो पोस्ट करत असते.
वाचा: महेश मांजरेकरांची पहिली पत्नी आहे तरी कोण? दोन्ही मुलांसोबत राहते एकटी

अदा शर्मा विषयी

अदाहने २००८मध्ये विक्रम भट्टच्या '१९२०' या हॉरर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील तिची लिसाची व्यक्तिरेखा चांगलीच गाजली होती. २०१४मध्ये ‘हँसी तो फँसी’ हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, तिने साऊथ चित्रपटांमध्ये एन्ट्री घेतली. तिने अनेक तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. बारावी पूर्ण होताच अदाने शिक्षण सोडले आणि चित्रपटात पाऊल ठेवले. आता अदा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे व्हिडिओ शेअर करते. अदा शर्मा एक जिम्नॅस्ट आहे आणि तिला जिम्नॅस्टिकसोबत डान्स करण्याचीही आवड आहे.

Whats_app_banner