‘महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून बाहेर पडण्यावर अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचं थेट वक्तव्य! म्हणाल्या...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून बाहेर पडण्यावर अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचं थेट वक्तव्य! म्हणाल्या...

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून बाहेर पडण्यावर अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचं थेट वक्तव्य! म्हणाल्या...

Apr 10, 2024 01:53 PM IST

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ का सोडली? यावरून विशाखा सुभेदार यांना अनेक प्रश्न विचारले गेले होते. विशाखा सुभेदार यांनी हा कार्यक्रम सोडल्यानं चाहते देखील नाराज झाले होते.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रामधून बाहेर पडले म्हणजे...’, अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचं थेट वक्तव्य! म्हणाल्या...
‘महाराष्ट्राची हास्यजत्रामधून बाहेर पडले म्हणजे...’, अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचं थेट वक्तव्य! म्हणाल्या...

अभिनेत्री विशाखा सुभेदार हे मराठी मनोरंजन विश्वातलं मोठं नाव आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी आपल्या दमदार अभिनयानं आणि विनोदांनी प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसवलं. विशाखा सुभेदार यांना ‘लाफ्टर क्वीन’ देखील म्हटलं जातं. ‘फु बाई फु’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ अशा अनेक विनोदी कार्यक्रमातून विशाखा सुभेदार यांनी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. केवळ टीव्ही कार्यक्रम किंवा मालिकाच नाही, तर विशाखा सुभेदार यांनी अनेक चित्रपट आणि नाटकं देखील गाजवली. विनोदी अभिनयात हातखंडा असणाऱ्या अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी तिच्या गाजलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून काढता पाय घेतला होता.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ का सोडली? यावरून विशाखा सुभेदार यांना अनेक प्रश्न विचारले गेले होते. विशाखा सुभेदार यांनी हा कार्यक्रम सोडल्यानं चाहते देखील नाराज झाले होते. मात्र, एका नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत विशाखा सुभेदार यांनी चाहत्यांची आणि प्रेक्षकांची ही नाराजी दूर केली होती. नेहमीच विनोदी भूमिका साकारणाऱ्या विशाखा सुभेदार यांनी सध्या एका मालिकेत खलनायकी भूमिका साकारायला सुरुवात केली आहे. छोट्या पडद्यावर सध्या चर्चेत असलेल्या ‘शुभविवाह’ या मालिकेत विशाखा सुभेदार ग्रे शेड भूमिका साकारताना दिसत आहेत.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीने उरकला साखरपुडा! नवराही आहे अभिनेता

जरी हास्यजत्रातून बाहेर पडले...

या दरम्यान त्यांची एक सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडली असे, म्हणत त्यांना ट्रोल करणाऱ्या लोकांना सणसणीत उत्तरचं दिलं आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना नुकताच राम नगरकर पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराचा वितरण सोहळा आता पार पडला आहे. या राम नगरकर पुरस्कार वितरण सोहळ्यातील एक फोटो शेअर करत, त्याच्या कॅप्शनमध्ये विशाखा सुभेदार यांनी लिहिलं की, ‘राम नगरकर पुरस्कार सोहळा २०२४. हा पुरस्कार या माझ्या गुरु स्थानी असलेल्या दोन सचिन मास्तर ह्यांच्याकडून मिळाला हे ही माझं भाग्य. हा पुरस्कार देण्याचे ज्यांनी ठरवलं ते वंदन नगरकर हे हयात नाही ह्याचे मात्र वाईट वाटले. फु बाई फु ते हास्यजत्रा.. विनोदी प्रहसन सादर करीत आले, त्याची शाबासकी मिळाली. पुरस्कार म्हटलं कीं, जबाबदारी आलीच.. जरी हास्यजत्रातून बाहेर पडले ह्याचा अर्थ असा नाही होत की, विनोदी अभिनय करणं सोडलं.. एक ब्रेक घेतला होता पुन्हा एखाद्या विनोदी भूमिकेत दिसेनच... रसिकांचे आणि नगरकर कुटुंबियांचे खुप आभार...’.

एका सर्जरीमुळे बिघडला होता अभिनेत्रीचा चेहरा! आता काय करते सलमान खानची ‘वाँटेड गर्ल’ आयेशा टाकिया?

‘रामनगर पुरस्कार २०२४’ हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर शेअर केलेल्या या पोस्टमधून विशाखा सुभेदार यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोसह त्यांच्या अभिनय कारकिर्दीवर देखील मोठं भाष्य केलं आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत असून, चाहत्यांसह अनेक कलाकार देखील यावर कमेंट करताना दिसत आहे.

Whats_app_banner