Titeeksha Tawde Relationship: प्रेमाचा महिना म्हणजे फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या या मुहूर्तावर अनेक जण आपल्या प्रेमाची कबुली देतात. असंच काहीसं आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने केलं आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्री तितीक्षा तावडे हिने देखील नुकतीच आपल्या प्रेमाची जाहीर कबुली देत लग्नाची घोषणा केली आहे. तितीक्षा तावडे हिने नुकतीच सोशल मीडियावरून आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. तिने आपल्या होणाऱ्या पतीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम नेत्रा म्हणजेच अभिनेत्री तितीक्षा तावडे, अभिनेता सिद्धार्थ बोडके याच्या प्रेमात पडली आहे. नुकताच दोघांचा केळवण सोहळा पार पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडियावर चाहते दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा करत आहेत. याआधीही दोघांना एकत्र पाहून चाहत्यांमध्ये हे दोघे रिलेशनमध्ये असल्याचा अंदाज बांधला होता. मात्र, दोघांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल जाहीर भाष्य केले नव्हते. मात्र, आता ‘प्रपोज डे’च्या निमित्ताने तितीक्षा आणि सिद्धार्थ यांनी इन्स्टाग्रामवर त्यांचा एक खास फोटो शेअर करत, आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.
अभिनेत्री तितीक्षा तावडे हिने सिद्धार्थ बोडकेसोबत केळवणाचा फोटो शेअर केला आहे. तिच्या या गुडन्यूजने चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. तितीक्षा तावडेने शेअर केलेल्या या फोटोमध्ये दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघताना दिसत आहेत. तितीक्षा तावडे हिने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘त्याने मला डेटसाठी विचारलं आणि आमच्या या सुंदर डेटचं केळवणात रुपांतर झालं’. या फोटोमध्ये तितीक्षा तावडे हिने सुंदर ऑफ व्हाइट रंगाची साडी नेसली आहे. तर, सिद्धार्थ बोडके यानेही सुंदर शर्ट परिधान केला आहे.
चाहते आता दोघांच्या या गुडन्यूजने आनंदी झाले आहेत. दोघांच्या या गोड फोटोवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. या फोटोवर चाहते लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. पल्लवी पाटील, सानिया चौधरी, हृता दुर्गुळे, रसिका सुनील, सुयश टिळक, स्पृहा जोशी, गौतमी देशपांडे, ऋतुजा बागवे, गौरी नलावडे, दीपा चौधरी, ऐश्वर्या नारकर यांसह अनेक कलाकारांनी तितीक्षा आणि सिद्धार्थ यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री तितीक्षा तावडे सध्या झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या लोकप्रिय मालिकेत ‘नेत्रा’ बनून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तर, सिद्धार्थ बोडके देखील त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे.
संबंधित बातम्या