तुझी हिंमतच कशी झाली!; राधाच्या लूकमधील तमन्नाचे फोटोशूट पाहून नेटकरी संतापले
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  तुझी हिंमतच कशी झाली!; राधाच्या लूकमधील तमन्नाचे फोटोशूट पाहून नेटकरी संतापले

तुझी हिंमतच कशी झाली!; राधाच्या लूकमधील तमन्नाचे फोटोशूट पाहून नेटकरी संतापले

Published Sep 05, 2024 02:13 PM IST

Tamannaah Bhatia Troll: अभिनेत्री तमन्ना भाटियाला सोशल मीडियावर एका फोटोशूटनंतर प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. या ट्रोलिंगनंतर तमन्नाने त्या फोटोशूटचे फोटो डिलीट केले आहेत.

Tamannaah Bhatia Troll: तमन्ना भाटिया
Tamannaah Bhatia Troll: तमन्ना भाटिया

Tamannaah Bhatia Trolled after Radharani Photoshoot: बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. अलीकडेच या अभिनेत्रीला सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. खरं तर तमन्ना भाटियाने एक फोटोशूट केलं होतं, ज्यात ती राधा बनली होती. तमन्नाने जेव्हा तिच्या इन्स्टाग्रामवर या फोटोशूटचे फोटो पोस्ट केले, तेव्हा लोकांनी तिला टार्गेट करण्यास सुरुवात केली. तमन्ना भाटियाच्या आउटफिटमुळे ट्रोलर्स संतापले होते. सोशल मीडियावर झालेल्या या जोरदार ट्रोलिंगनंतर तमन्नाने राधा रूपातील आपले फोटो डिलीट केले आहेत.

फोटोशूटनंतर तमन्ना भाटिया झाली ट्रोल!

नुकतेच तमन्ना भाटिया हिने आपले राधा रूपातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिने हे फोटोशूट एका फॅशन ब्रँडसाठी केले होते. करण तोराणी यांच्या या कॅम्पेनचे नाव 'लीला : द डिव्हाइन इल्युजन ऑफ लव्ह' असे होते. राधा आणि कृष्ण यांच्यातील प्रेमाचे वेगवेगळे टप्पे यात दाखवण्यात आले. यात तमन्ना राधा बनली होती. राधाच्या भूमिकेत लोकांनी आधी तमन्ना भाटियाचं भरभरून कौतुक केलं. मात्र, आता तमन्ना भाटियाचे कपडे पाहून काही लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

Tamannaah Bhatia: हॉटनेस ओव्हरलोडेड! तमन्ना भाटियाच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ!

एका युजरने तमन्नाच्या फोटोशूटमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की, ‘तुमच्या व्यवसायासाठी आमच्या लाडक्या राधा राणी आणि श्रीकृष्णाच्या सर्वात पवित्र नात्याचे लैंगिकीकरण थांबवा! तुम्ही मूर्ख आहात का? तुमची हिंमतच कशी झाली?’ तर एका युजरने, तिचा व्हिडीओ शेअर करत, तमन्नाला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केलं आहे.

 

सोशल मीडियावरील कमेंट
सोशल मीडियावरील कमेंट

यानंतर तमन्ना आणि करण तौरानी या दोघांनीही हे फोटो आपल्या सोशल मीडियावरून डिलीट केले आहेत. मात्र, या संपूर्ण वादावर तमन्नाच्या वतीने कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.

चित्रपटांमुळेही चर्चेत आहे तमन्ना भाटिया!

तमन्ना भाटियाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'स्त्री २' या ब्लॉकबस्टर चित्रपटात एक विशेष भूमिका साकारताना दिसली होती. या चित्रपटात तिने 'आज की रात' गाण्यात आपल्या अदा दाखवल्या होत्या. तिच्या नृत्याने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली होती. त्याच वेळी, ती स्वातंत्र्यदिनी रिलीज झालेल्या जॉन अब्राहमच्या 'वेदा' या चित्रपटाचा एक भाग होती. मात्र, तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही.

Whats_app_banner