मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Suchandra Dasgupta: २९ वर्षीय अभिनेत्रीचा रस्ते अपघातात मृत्यू

Suchandra Dasgupta: २९ वर्षीय अभिनेत्रीचा रस्ते अपघातात मृत्यू

Aarti Vilas Borade HT Marathi
May 22, 2023 03:54 PM IST

Suchandra Dasgupta Died: मालिकेचे चित्रीकरण करुन रात्री घरी परतत असताना अभिनेत्रीचा अपघात झाला. या अपघातात तिचा मृत्यू झाला आहे.

Suchandra Dasgupta Died
Suchandra Dasgupta Died

बंगाली अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ताचा कार अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. तिच्या अचानाक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सुचंद्राच्या कुटुंबीयांना तर धक्काच बसला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सुचंद्रा शनिवारी रात्री चित्रीकरण करुन घरी परतत होती. घरी येण्यासाठी तिने एका अॅपवरुन बाईक बूक केली होती. पण रस्त्यात एक सायकल सवार अचानक रस्त्यात आल्यामुळे बाईक ड्रायव्हरने ब्रेक दाबला. त्यामुळे मागची गाडी येऊन त्यांच्या बाईकला धडकली. अभिनेत्री बाईकवरुन खाली पडली आणि तिच्या अंगावरुन ट्रॅक गेला. अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला.

काही वेळातच बारानगर येथील पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ट्रक आणि ट्रक चालकाला अटक केली. पोलीस या प्रकरणी चौकशी करताना दिसत आहेत.

सुचंद्रा दासगुप्ता बंगाली टीव्ही अभिनेत्री आहे. ती अतिशय लोकप्रिय आहे. तिने अनेक बंगाली मालिकांमध्ये काम केले आहे. गौरी या मालिकेत तिने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे. या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. तिच्या अचानक जाण्याने कुटुंबीय आणि चाहत्यांना धक्का बसला आहे.

WhatsApp channel

विभाग