मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Poonam Pandey Died: भारत वर्ल्डकप जिंकल्यानंतर पूनम पांडेला व्हायचे होते न्यूड, काय होते कारण?

Poonam Pandey Died: भारत वर्ल्डकप जिंकल्यानंतर पूनम पांडेला व्हायचे होते न्यूड, काय होते कारण?

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 02, 2024 12:55 PM IST

Poonam Pandey Death: पूनम पांडेने एका मुलाखतीमध्ये वादग्रस्त विधान करण्यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी तिने २०११च्या वर्ल्ड कपचा देखील उल्लेख केला होता.

Poonam Pandey Died
Poonam Pandey Died

चित्रपटसृष्टीत बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री पूनम पांडेचे निधन झाले आहे. सर्वायवल कॅन्सरमुळे पूनमचा मृत्यू झाला आहे. वयाच्या ३२व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. सोशल मीडिया पोस्टद्वारे पूनमच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. अनेकजण तिला श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

पूनम २०११मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तिने भारत वर्ल्डकप जिंकल्या अंतिम सामन्यादरम्यान केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. 'जर भारत हा वर्ल्डकप जिंकला तर मी सर्वांसमोर कपडे काढेन' असे वक्तव्य पूनमने केले होते. त्यावेळी पूनमची जोरदार चर्चा रंगली होती. त्यानंतर २०२३मध्ये पूनमने यावर भाष्य केले होते. तिने असे वादग्रस्त विधान करण्यामागचे कारण देखील सांगितले होते.
वाचा: डॉक्टर अन् डिम्पीचं खऱ्या आयुष्यातही जुळलं? ‘त्या’ पोस्टनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता

पूनमने नवभारत टाईम्सला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिला २०११मध्ये केलेल्या विधानावर प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा पूनमने “मी यापुढे वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करणार आहे. मला असे वाटते की, एखाद्या वादग्रस्त गोष्टींमुळे तुम्हाला मिळणारी प्रसिद्धी ही फक्त १५ मिनिटांसाठी असते. त्यापेक्षा जास्त नाही. तो वाद सुरु असेपर्यंत लोक तुमची चर्चा करतात पण त्यानंतर ते तुम्हाला विसरले असतात. पण त्या उलट तुम्हाला तुमच्या कामामुळे मिळालेली ओळख दीर्घकाळ टिकते" असे उत्तर दिले होते.

पूनम मूळची कानपूर येथील आहे. तिने कानपूरमधील गृहनगर येथील घरी अखेरचा श्वास घेतला. याच ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

सोशल मीडिया पोस्टद्वारे पूनमच्या निधनाची माहिती

पूनम पांडेच्या टीमने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन निधनाची माहिती दिली आहे. ‘आजची सकाळ ही आमच्यासाठी खूप कठीण आहे. तुम्हाला कळवताना दु:ख होत आहे की मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचे सर्वायकल कन्सरने निधन झाले आहे. आजवर तिच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने तिच्यावर प्रेम केले’ या आशयाची पोस्ट तिच्या अकाऊंटवर करण्यात आली आहे. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी श्रद्धांजली वाहिली.

 

२०१३मध्ये पूनम पांडेने केले बॉलिवूडमध्ये पदार्पण

पूनमने २०१३मध्ये 'नशा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पूनम ही विशेष करुन तिच्या न्यूड आणि बोल्ड फोटोंसाठी ओळखली जायची. तिने कंगना रणौतच्या 'लॉकअप' या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. या शोमध्ये देखील वादग्रस्त विधान आणि अश्लील वागण्यामुळे ती चर्चेत होती.

WhatsApp channel

विभाग