मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Poonam Pandey: निधनाच्या स्टंटमुळे पूनम पांडेला मोठा झटका, नेमकं काय झालं जाणून घ्या

Poonam Pandey: निधनाच्या स्टंटमुळे पूनम पांडेला मोठा झटका, नेमकं काय झालं जाणून घ्या

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 12, 2024 12:58 PM IST

Poonam Pandey Stunt: गेल्या काही दिवसांपासून पूनम पांडे ही चर्चेत आहे. तिने केलेल्या स्टंटने सर्वांचे लक्ष वेधले. या स्टंटचा पूनमला मोठा फटका बसला आहे.

Mumbai, Feb 03 (ANI): Actress and model Poonam Pandey posts a video on her Instagram account and confirms she is alive and faked her death, in Mumbai on Saturday. She said her stunt was aimed at spreading awareness regarding cervical cancer. (ANI Photo)
Mumbai, Feb 03 (ANI): Actress and model Poonam Pandey posts a video on her Instagram account and confirms she is alive and faked her death, in Mumbai on Saturday. She said her stunt was aimed at spreading awareness regarding cervical cancer. (ANI Photo) (ANI)

Poonam Pandey: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री पूनम पांडे ही चर्चेत आहे. तिने केलेल्या स्टंटने सर्वांचे लक्ष वेधले. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने पूनमचे निधन झाल्याची माहिती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे देण्यात आली होती. त्यानंतर पूनमने एक व्हिडीओ शेअर करत जीवंत असल्याची माहिती दिली. या सर्व प्रकरणानंतर पूनमचे काहींनी कौतुक केले तर काहींनी तिला ट्रोल केले. आता या सगळ्याचा पूनमला मोठा फटका बसला आहे.

पूनम पांडेचे अनेक ब्राँडसोबत करार आहेत. पण पूनमने केलेल्या निधनाच्या स्टंटने मोठा फटका बसला आहे. अमेरिकेतील फार्मास्‍यूटिकल कंपनी मर्कने भारतीय उपकंपनी असलेल्या एमएसडीने पूनम पांडेला मोठा झटका दिलाय. हा निधनाचा स्टंट करणे पूनम पांडेला महागात पडले. आता हा मोठा करार रद्द करण्यात आला आहे. क्रिएटिव्ह मार्केटिंग सोल्युशन्स एजन्सीसोबतचा तिचा करार संपवला आहे. विशेष म्हणजे ही तीच एजन्सी आहे जी मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेच्या या वादग्रस्त पब्लिसिटी स्टंटमध्ये सामील होती. या कंपनीला देखील मोठा फटका बसल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.
वाचा: सध्याचं राजकारण त्रासदायक; मोहन आगाशेंनी व्यक्त केली चिंता

पूनम पांडेच्या या स्टंटमुळे तिला फटका तर बसला आहे त्यासोबतच त्याचे काही फायदे देखील झाले आहेत. पीटीआयने दिलेल्या रिपोर्टनुसार, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगामुळे निधन झाल्याची अफवा पसरवणारी पूनम पांडेची नियुक्ती सरकारच्या कर्करोगच्या मोहिमेची ब्रँड अॅम्बेसिडर होण्याची शक्यता आहे. पूनमची टीम आणि आरोग्य मंत्रालय यांच्यामध्ये याबाबत चर्चा सुरु आहे. आता तिला ही जबाबदारी मिळणार की नाही हे येत्या काळात समोर येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

निधन झाल्याची अफवा

काही दिवसांपूर्वी पूनमच्या टीमने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने पूनमचे निधन झाल्याचे सांगत खळबळ माजवली होती. त्यानंतर पूनमने जीवंत असल्याचे व्हिडीओ शेअर करत सांगितले. तिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिला ट्रोल केले. कर्करोगाशी संबंधीत जागरुकता निर्माण करण्यासाठी हे मोठे पाऊल उचलले असे सांगत पूनमने काहींची मने जिंकली. पण काहींनी तिला चांगलेच सुनावले.

२०१३मध्ये पूनम पांडेने केले बॉलिवूडमध्ये पदार्पण

त्यानंतर पूनमने २०१३मध्ये 'नशा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पूनम ही विशेष करुन तिच्या न्यूड आणि बोल्ड फोटोंसाठी ओळखली जायची. तिने कंगना रणौतच्या 'लॉकअप' या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. या शोमध्ये देखील वादग्रस्त विधान आणि अश्लील वागण्यामुळे ती चर्चेत होती.

WhatsApp channel