मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सोनाक्षी सिन्हाचा होणारा पती झहीर इक्बालला अभिनेत्री पूनम ढिल्लनचा 'इशारा'! म्हणाली, ‘लक्षात ठेव...’

सोनाक्षी सिन्हाचा होणारा पती झहीर इक्बालला अभिनेत्री पूनम ढिल्लनचा 'इशारा'! म्हणाली, ‘लक्षात ठेव...’

Jun 15, 2024 08:20 AM IST

सोनाक्षी सिन्हा २३ जून रोजी तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न करणार आहे. त्यांच्या लग्नासाठी बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आलं आहे. अभिनेत्री पूनम ढिल्लन यांनाही सोनाक्षीच्या लग्नाचं आमंत्रण मिळालं आहे.

सोनाक्षी सिन्हाचा होणारा पती झहीर इक्बालला अभिनेत्री पूनम ढिल्लनचा 'इशारा'!
सोनाक्षी सिन्हाचा होणारा पती झहीर इक्बालला अभिनेत्री पूनम ढिल्लनचा 'इशारा'! ((Pic Credit: Instagram))

बॉलिवूडची ‘दबंग’ गर्ल अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल ही जोडी येत्या २३ जून रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. सोनाक्षी तिच्या बॉयफ्रेंडसोबत रजिस्टर्ड मॅरेज करणार असून, २३ जूनला बॉलिवूडच्या मित्रपरिवारासोबत पार्टी करणार आहे. सोनाक्षीच्या या लग्नाच्या पार्टीत बॉलिवूडचे अनेक सेलेब्स सहभागी होणार आहेत. सोनाक्षीच्या लग्नाचं निमंत्रण अभिनेत्री पूनम ढिल्लनलाही मिळालं आहे. लग्नाचे आमंत्रण मिळाल्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला आहे. इतकंच नाही तर, सोनाक्षीला तिच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आमंत्रण मिळाल्यावर पूनम ढिल्लन काय म्हणाली?

पूनम ढिल्लनने इन्स्टा बॉलिवूडला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की, "तिने खूप क्यूट आमंत्रण पाठवले आहे. मी तिला लहानपणापासून ओळखते. मी तिचा संपूर्ण प्रवास पाहिला आहे, म्हणून देव तिला भावी आयुष्यासाठी खूप आशीर्वाद देवो. ती खूप गोड आणि प्रेमळ मुलगी आहे. मी तिला भरभरून सुख मिळावे, अशा शुभेच्छा देईन.'  इतकंच नाही तर, पूनम ढिल्लनने सोनाक्षीचा होणारा नवरा झहीर इक्बाललाही मजेशीर अंदाजात इशारा दिला आहे. ‘झहीर, तिला खुश ठेव, लक्षात ठेवा, ती खूप गोड मुलगी आहे. तिचं हसू आपल्या सर्वांसाठी खूप मौल्यवान आहे.’

ट्रेंडिंग न्यूज

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांच्या लग्नाचे निमंत्रण सोशल मीडियावर लीक झाले होते. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी अतिशय खास पद्धतीने लोकांना आमंत्रण पाठवले आहे. सोनाक्षी आणि झहीरने सगळ्या मित्र आणि मैत्रिणींना लग्नाच्या सेलिब्रेशनला बोलवण्यासाठी ऑडिओ आमंत्रण पाठवले आहे. त्या निमंत्रणात सोनाक्षी आणि झहीरने आपल्या लग्नाच्या वृत्ताला देखील दुजोरा दिला होता. सोनाक्षी आणि झहीर यांच्या या आमंत्रणात लग्नात लाल रंगाचे कपडे घालून येऊ नयेत, असे देखील खास सांगण्यात आले आहे.

रवीना टंडनचा ‘तो’ व्हिडीओ खोटा! सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्याच्या विरोधात दाखल केला मानहानीचा दावा!

कुठे असेल लग्नाची पार्टी?

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाची पार्टी शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंट ‘बुरुज’मध्ये पार पडणार आहे. ‘हीरामंडी’च्या कलाकारांपासून ते दिग्दर्शक संजय लीला भन्साळींपर्यंत अनेक दिग्गज सेलिब्रिटी या लग्नाला हजेरी लावण्यासाठी येणार आहेत. एकाकीकडे सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, दुसरीकडे तिच्या कुटुंबाकडून आलेल्या प्रतिक्रिया या अतिशय वेगळ्या आहेत. प्रत्येकाच्या प्रतिक्रियेवरून असे वाटत आहे की, सोनाक्षीने घरात कुणाला तिच्या लग्नाची कल्पना दिली नसावी, अथवा तिच्या कुटुंबाकडून या लग्नाबाबत नाराजी असावी.

WhatsApp channel