अभिनेत्रींचे आयुष्य जितके ग्लॅमरस दिसत असते तितकच ते सांभाळण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. अभिनेत्रीला प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. मग तो ग्लॅमरस लूक असो वा स्वत:चे खासगी आयुष्य. दोन्ही सांभाळणे अभिनेत्रींसाठी तारेवरची कसरत असते. सध्या सोशल मीडियावर एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा एमएमएस लीक झाला आहे. या एमएमएसने सगळीकडे खळबळ उडाली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एमएमएसमध्ये अभिनेत्री ओविया हेलन दिसत आहे. सध्या एका व्हायरल व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या खासगी एमएमएसमुळे अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या आहेत. या व्हायरल व्हिडीओमधील तरुण अभिनेत्री ओविया हेलन असल्याचा दावा युजर्स करत आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
अभिनेत्री ओविया हेलनचा लीक झालेल्या एमएमएसने तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ उडवली आहे. बिग बॉस सिझन १मध्ये दिसलेली ओविया हेलनने पोलिसात तक्रार केली आहे. या प्रकरणी पोलीस चौकशी सुरु आहे. चेन्नई पोलीस आयुक्तांकडे ही तक्रार दाखल झाली आहे.
वाचा: पहिले लग्न मग ४ वर्षात घटस्फोट, दादा कोंडके यांच्या पत्नीविषयी माहिती आहे का?
अभिनेत्री ओविया हेलन हे तमिळ इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनेत्री ओवियाचं खरं नाव हेल्सन नेल्सन आहे, पण चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर तिनं तिचं नाव बदलून ओविया ठेवलं. ओविया ख्रिश्चन कुटुंबातील आहे. २००९ मध्ये तिने तमिळ सिनेसृष्टीत पदार्पण केलं असून साऊथच्या अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. बिग बॉस तमिळ सीझन 1 द्वारे अभिनेत्री ओविया हेलनला प्रसिद्धी मिळाली. आता तिचा कथित एमएमएस व्हिडीओ लीक झाल्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
संबंधित बातम्या