Fact Check : बंजी जंप करताना उंचावरून पडून नोरा फतेहीचा मृत्यू? काय आहे व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Fact Check : बंजी जंप करताना उंचावरून पडून नोरा फतेहीचा मृत्यू? काय आहे व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य?

Fact Check : बंजी जंप करताना उंचावरून पडून नोरा फतेहीचा मृत्यू? काय आहे व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य?

Feb 05, 2025 01:00 PM IST

Actress Nora Fatehi Accident : अभिनेत्री नोरा फतेहीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे.

बंजी जंप करताना उंचावरून पडून नोरा फतेहीचा मृत्यू? काय आहे व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य?
बंजी जंप करताना उंचावरून पडून नोरा फतेहीचा मृत्यू? काय आहे व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य?

Nora Fatehi Accident Death : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'डान्सिंग क्वीन' नोरा फतेही तिच्या खास स्टाईल आणि फॅशनसाठी ओळखली जाते. नोरा फतेही सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिचे डान्सिंग व्हिडिओ आणि फॅशन व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडतात. पण, आता अभिनेत्री एका भलत्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री नोरा फतेहीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिच्या निधनाची बातमी देण्यात आली असून, हा व्हिडिओ आता तुफान व्हायरल होत आहे. नोरा फतेही हीच्या अपघाताचा हा व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी लाखोंनी कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे. पण, या व्हिडिओचं सत्य काय आहे?

नेमकं सत्य काय? जाणून घ्या!

सध्या सोशल मिडियावर नोरा फतेहीचा अपघातात मृत्यू झाल्याची अफवा जोरदार पसरत आहे. मात्र, ही केवळ एक अफवा आहे. या व्हिडिओ मागचं सत्य वेगळंच आहे. एका इन्स्टा पोस्टवर नोरा फतेहीच्या अपघाताचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये, एका मुलीचा बंजी जंपिंग करताना अपघात होत असल्याचे दिसत आहे आणि या दरम्यान ती तरुणी खड्ड्यात पडताना दिसत आहे.

ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून, अभिनेत्री नोरा फतेही असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नोरा फतेहीच्या मृत्यूचाही उल्लेख करण्यात आला आहे. पण, आता या व्हिडिओची तपासणी केल्यानंतर असे आढळून आले की, हा व्हिडिओ नोरा फतेहीचा नसून दुसऱ्याच एका महिलेचा आहे. इतकंच नाही तर, या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेचा कोणताही अपघात झालेला नसून, हा केवळ बंजी जंपिंगचा एक भाग असल्याचे म्हटले जात आहे.

नोरा फतेही पूर्णपणे ठीक!

आता नोरा फतेहीच्या जवळच्या सूत्रांनी नोरा पूर्णपणे ठीक असल्याचे म्हटले आहे. तिच्या टीमने देखील अभिनेत्री अगदी सुरक्षित आणि सुखरूप असल्याचे म्हटले आहे. इतकंच नाही तर, अभिनेत्री सोशल मीडियावरही सक्रिय आहे. नोराच्या नावाने सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला हा व्हिडिओ पूर्णपणे खोटा आहे. नोरा फतेहीच्या टीमकडून तिच्या तब्येतीबद्दल कळताच आता तिच्या सगळ्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. तिचे सगळेच चाहते तिच्यासाठी प्रार्थना करताना दिसले होते.

Whats_app_banner