मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nayana Apte: गडगंज संपत्ती असून देखील नयना आपटेंना सोडावं लागलं होतं राहतं घर! कारण ऐकलंत का?

Nayana Apte: गडगंज संपत्ती असून देखील नयना आपटेंना सोडावं लागलं होतं राहतं घर! कारण ऐकलंत का?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 20, 2024 05:24 PM IST

Actress Nayana Apte Story: वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी नयना आपटे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. अभिनयाचं बाळकडू त्यांना आई अभिनेत्री शांत आपटे यांच्याकडूनच मिळालं होतं.

Actress Nayana Apte Story
Actress Nayana Apte Story

Actress Nayana Apte Story: आपल्या दमदार अभिनयाने सहाय्यक भूमिकांना अगदी महत्त्वाचं स्थान मिळवून देणाऱ्या अभिनेत्रींमध्ये नयना आपटे यांचे नाव आवर्जून घेतले जाते. मनोरंजन विश्वातील या जेष्ठ दिग्गज अभिनेत्रीने केवळ चित्रपटच नाही तर, नाटक आणि मालिका विश्व देखील गाजवलं. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी नयना आपटे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. अभिनयाचं बाळकडू त्यांना आई अभिनेत्री शांत आपटे यांच्याकडूनच मिळालं होतं. शांता आपटे या मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेत्री होत्या. त्यांना मनोरंजन विश्वातील बंडखोर नायिका देखील म्हटले जायचे. प्रसिद्धी, पैसा, घर सगळं काही त्यांच्याकडे होतं. मात्र, तरीही एक वेळ अशी आली, जेव्हा नयना आपटे यांना बेघर व्हावं लागलं होतं.

अभिनेत्री शांता आपटे यांनी आपल्या अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवलं होतं. त्यांनी ‘कुंकू’, ‘अमरज्योती’सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यावेळी एखाद्या चित्रपटात काम करण्यापूर्वी कलाकारांना कंपनीशी करार करावा लागायचा. असाच करार शांता आपटे यांनी ‘प्रभात’ फिल्म कंपनीसोबत केला होता. या बॅनरसोबत त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. मात्र, त्या दरम्यान आलेल्या ‘माणूस’ या चित्रपटासाठी काही वेगळ्या नायिकांना बोलवण्यात आले. यामुळे शांता आपटे चांगल्याच संतापल्या होत्या. याविरोधात त्यांनी बंड पुकारला होता. काम करण्यासाठी आधी आपले मानधन वाढवून द्या नाहीतर करारातून मुक्त करा, अशी मागणी त्यांनी केली होती.

Deepika Padukone Pregnant: दीपिका-रणवीरच्या घरी चिमुकला पाहुणा येणार? प्रेग्नन्सीच्या चर्चांना उधाण

चौथ्या वर्षी मनोरंजन विश्वात पदार्पण

केवळ मराठीच नव्हे तर, शांता आपटे यांनी हिंदी आणि साऊथ चित्रपटांमध्ये देखील काम केले. अभिनयासोबतच त्या उत्तम गायच्या. अभिनयासोबतच त्यांनी चित्रपटाची गाणी देखील गायली. पडद्यावर ज्याप्रकारे त्यांनी दमदार भूमिका साकारल्या, तशाच त्या प्रत्यक्ष आयुष्यात देखील अतिशय निर्भीड होत्या. त्यांचे हेच गुण त्यांच्या लेकीने म्हणजे अभिनेत्री नयना आपटे यांनी घेतले होते. नयना आपटे त्यांच्या आई शांता आपटे यांच्याप्रमाणेच निर्भीड होत्या. चौथ्या वर्षी त्यांनी रंगमंचावर पाऊल ठेवले. इतकंच नाही तर, गाण्याचे धडे देखील गिरवले. मात्र, नयना आपटे अवघ्या १४ वर्षांच्या असताना त्यांचे मातृछत्र हरपले. २४ फेब्रुवारी १९६४ रोजी शांता आपटे यांचे कॅन्सरने निधन झाले.

का सोडावं लागलं घर?

वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी नयना आपटे यांना आपल्या आईला अखेरचा निरोप द्यावा लागला होता. शांता आपटे यांच्या निधनानंतर त्यांची सगळी संपत्ती सील करण्यात आली होती. तर, वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर नयना यांना कादेशीर अधिकार मिळणार होते. त्यामुळे वयाच्या १४व्या वर्षी आई गमावल्यानंतर नयना यांना राहते घर देखील सोडावे लागले होते. स्वतःचं घर असताना देखील मातृछत्र हरपल्यानंतर त्यांच्या डोक्यावरचं छप्पर देखील हिरावून घेतलं गेलं होतं. त्यावेळी त्यांनी पुण्यात राहून आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या पुन्हा मनोरंजन विश्व गाजवण्यासाठी सज्ज झाल्या. त्यांनी आपल्या अभिनयाच्या बळावर अनेक दमदार चित्रपट आणि मालिका गाजवल्या.

IPL_Entry_Point