रूममध्ये सुरू होता ग्रुप सेक्स; फिल्ममेकर्सनी जबरदस्ती बोलावलं अन्... अभिनेत्रीच्या आरोपांनी उडाली खळबळ!-actress minu muneer made serious allegation on co actor and film maker after hema committee report ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  रूममध्ये सुरू होता ग्रुप सेक्स; फिल्ममेकर्सनी जबरदस्ती बोलावलं अन्... अभिनेत्रीच्या आरोपांनी उडाली खळबळ!

रूममध्ये सुरू होता ग्रुप सेक्स; फिल्ममेकर्सनी जबरदस्ती बोलावलं अन्... अभिनेत्रीच्या आरोपांनी उडाली खळबळ!

Sep 30, 2024 08:59 AM IST

Actress Minu Muneer :मल्याळम अभिनेत्री मीनू मुनीर हिने चित्रपट निर्माते बालचंद्र यांच्यावर गंभीर आरोप केले असून, २००७मध्ये त्यांनी तिला सामूहिक लैंगिक क्रीडा पाहण्यास भाग पाडले असे म्हटले आहे.

Actress Minu Muneer
Actress Minu Muneer

Actress Minu Muneer : मल्याळम अभिनेत्री मीनूने चित्रपट निर्माते-अभिनेते बालचंद्र मेनन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्री म्हणाली की, २००७मध्ये बालचंद्रने तिला इतरांसोबत सुरू असलेली लैंगिक कृत्ये पाहण्यास भाग पाडले. याआधी मीनूने आणखी ७ जणांवर शारीरिक आणि शाब्दिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. या यादीत प्रसिद्ध अभिनेते जयसूत्रच्या नावाचाही समावेश आहे. तिची तक्रार लक्षात घेऊन एफआयआर नोंदवण्यात आला आहे. एका मुलाखतीत मीनू मुनीर यांनी हेमा समितीच्या अहवालाचा परिणाम आणि स्वतःचा अनुभव याबद्दल मोकळेपणाने भाष्य केले आहे.

जबरदस्तीने खोलीत नेऊन सामूहिक सेक्स दाखवला!

मीनू मुनीरने याबद्दल बोलताना सांगितले की, मेननने २००७मध्ये तिच्या खोलीत जबरदस्तीने सामूहिक सेक्स दाखवला होता. ती म्हणाली की, ‘त्या रूममध्ये तिथे आणखी काही लोक बसले होते, जे हे सर्व पाहत होते. तिथे तीन मुली होत्या आणि ते स्वतः त्यात सामील होते. मी कशीबशी त्या खोलीतून बाहेर पडले. मात्र, त्यांनी मला तिथे बसून हे सर्व बघायला सांगितले होते.’ 

Viral Video : ऐश्वर्या रायला बघताच चाहतीला अश्रू अनावर! अभिनेत्रीची कृती पाहून चाहते करू लागले वाह वाह!

हेमा समितीच्या अहवालामुळे होतेय मदत

मीनू यांनी म्हटले की, हेमा समितीचा हा अहवाल प्रकाशित झाल्यावर तिला हेच वाटले की, तक्रारींवर आता गुन्हा दाखल केला गेला पाहिजे. आपल्या प्रवासाचे वर्णन करताना मीनू मुनीर इंडस्ट्रीपासून आपला भ्रमनिरास कसा झाला हे सांगितले. अभिनेत्री म्हणाली की, ‘माझी अनेक स्वप्ने होती, पण ही इंडस्ट्री माझ्यासाठी दुःस्वप्न ठरली. हा हेमा समितीचा अहवाल केवळ इंडस्ट्री नव्हे, तर आपला समाजही शुद्ध करत आहे.’ 

तडजोड करण्यासाठी फोन येतात!

अभिनेत्रीच्या चुलत बहिणीनेच अभिनेत्रीवर पोक्सो अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. याबद्दल बोलताना मीनू म्हणाल्या की, ‘ती माझ्यावर राग काढत आहे, कारण मी तिला ऑफर मिळवण्यात मदत केली नाही. मला इंडस्ट्री कशी आहे हे माहित असताना, मी तिला कशी मदत करू? कारण माझ्या विरोधात इथे काही घटक आहेत. ही एक लढाई आहे, जी मला स्वतःला लढायची आहे. चर्चेद्वारे प्रकरण मिटवण्यासाठी आणि तडजोड करण्यासाठी अनेक फोन आले आहेत, ज्यामध्ये मला पैशाची ऑफर देखील देण्यात आली आहे. मात्र, आता मी अनोळखी नंबरवरून कॉल उचलत नाही.’

Whats_app_banner
विभाग