मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mayuri Deshmukh: पतीच्या निधनानंतर मयुरी देशमुख कामावर परतली; 'या' चित्रपटातून करतेय कमबॅक!

Mayuri Deshmukh: पतीच्या निधनानंतर मयुरी देशमुख कामावर परतली; 'या' चित्रपटातून करतेय कमबॅक!

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 23, 2024 12:44 PM IST

Mayuri Deshmukh movie LagnaKallol: मयूरी देशमुखसोबत या चित्रपटात भूषण प्रधान आणि सिद्धार्थ जाधव देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Mayuri Deshmukh
Mayuri Deshmukh

‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख. दोन वर्षांपू्र्वी तिच्या पतीचे निधन झाले. आत्महत्या करत मयुरीच्या पतीने जीवन संपवले होते. पती आशुतोषच्या जाण्याच्या धक्क्यातून अभिनेत्री मयुरी देशमुख स्वतः सावरण्याचा प्रयत्न करत पुन्हा जोमाने उभे राहण्याचा प्रयत्न करते आहे. आता तिचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहते तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

मयूरीच्या या चित्रपटाचे नाव 'लग्न कल्लोळ' आहे. या चित्रपटाचे एक जबरदस्त मोशन पोस्टर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. पोस्टरमध्ये भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव पाठमोरे दिसत होते. आता त्यांच्या लूकवरील पडदा उठला असून त्यांचे चेहरे समोर आले आहेत. सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान दोघेही मुंडावळ्या बांधून वरमाला घेऊन सज्ज आहेत. मात्र दोघांपैकी कोण मयुरीच्या गळ्यात ही वरमाला घालणार, हे अद्याप गुपित आहे. हे गुपित १ मार्चला उलगडणार आहे.
वाचा: ‘मी अयोध्येला पुन्हा येणार’; सुपरस्टार रजनीकांत बेहद्द खुष

'लग्न कल्लोळ' या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित 'लग्न कल्लोळ' या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे.

मयुरी देशमुखची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. मयुरी देशमुख हिचा २० जानेवारी २०१६ रोजी आशुतोष भाकरेशी लग्न झाले होते. आशुतोषने ‘इच्यार ठरला पक्का’ आणि ‘भाकर’ या दोन चित्रपटांमध्ये काम केले होते. तर लॉकडाउनपूर्वी मयुरीचे ‘तिसरे बादशाह हम’ हे नाटक रंगभूमीवर सुरु होते. मयुरी देशमुख कामाबद्दल बोलायचे तर तिने ‘इमली’ या मालिकेत साकारलेली मालिनी ही भूमिका बरीच गाजली. आता तिच्या आगामी चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत.

WhatsApp channel