मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  रस्त्यावर कचरा उचलताना दिसली मलायका अरोरा! Viral Video पाहून नेटकरी म्हणतायत...

रस्त्यावर कचरा उचलताना दिसली मलायका अरोरा! Viral Video पाहून नेटकरी म्हणतायत...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 22, 2024 08:49 AM IST

सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये मलायका जमिनीवर कचरा उचलून कॅमेऱ्यासमोर येऊन तो डस्टबिनमध्ये टाकताना दिसली आहे.

रस्त्यावर कचरा उचलताना दिसली मलायका अरोरा!
रस्त्यावर कचरा उचलताना दिसली मलायका अरोरा!

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री पुन्हा एकदा कॅज्युअल लूकमध्ये बॉडी फ्लाँट करताना दिसत आहे. यावेळी तिने ग्रे टँक टॉपसह आणि ग्रे वर्कआउट पँट घातली आहे. तिचा लूक अगदी साधा असूनही, तिचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र, तिचा व्हिडीओ व्हायरल होण्याचे कारण तिचा लूक नसून दुसरच काही तरी काही आहे. या व्हिडीओमध्ये मलायका मुंबईच्या रस्त्यांवरून कचरा उचलताना दिसत आहे.

सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये मलायका जमिनीवर कचरा उचलून कॅमेऱ्यासमोर येऊन तो डस्टबिनमध्ये टाकताना दिसली आहे. आता अभिनेत्रीची ही कृती पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. मलायका असे काही करू शकते, यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. खरं तर, सेलिब्रिटी लोकांचे किती नखरे असतात हे संपूर्ण जगाला माहीत आहे. अनेकदा हे लोक पापाराझींवर देखील भडकताना दिसतात. अशा स्थितीत मलायका दुसऱ्याने फेकलेला कचरा स्वत:च्या हाताने उचलते, हे खरोखरच लोकांना आश्चर्यचकित करणारे ठरले आहे.

लोकांनी केला दिखाऊपणाचा आरोप!

सेलिब्रेटी असूनही मलायका आपला परिसर कसा स्वच्छ ठेवते, हे पाहून लोकांनी तिचे कौतुक करण्याऐवजी तिला ट्रोल केले आहे. मलायकाला कचरा उचलताना पाहून एका युजरने लिहिले की, 'कॅमेऱ्यासमोर या अशा गोष्टी करणे म्हणजे स्टंट.. कदाचित तिनेच कचरा फेकले असेल'. आणखी एकाने गंमतीने म्हटलं की, 'कॅमेरा मॅन आहे का तिकडे? चला मला लवकर कचरा टाकू द्या.’ आणखी एकाने लिहिले की, 'भाई, मी कॅमेरा बघून हे असं करू शकतो.’ आणखी एका युजरने खिल्ली उडवत लिहिले की, 'तुमच्यासारख्या लोकांची बीएमसीमध्ये खूप गरज आहे...'. 'तिने हे प्रसिद्धी मिळवण्यासाठी केले आहे', असे एकाने म्हटले आहे. आणखी एकाने एक ट्रोल करत लिहिले कि, 'माझ्यामागे कॅमेरे असतील तर मी शोधून शोधून कचरा फेकेन.’ ‘आता यांचे चित्रपट चालत नाही, फक्त कचरा टाकायची काम करतात’, असे लोक म्हणत आहे.

‘जवळ ही येऊ द्यायची नाही! नोकरीच्या नावाखाली...’; ‘महाभारत’च्या ‘कृष्णा’चा पत्नीवर खळबळजनक आरोप!

लोकांनी मारले टोमणे!

'हे फक्त व्हिडिओसाठी आहे', असे लोक सोशल मीडियावर म्हणत आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, 'कॅमेरा बंद असता तर तिने लक्षही दिले नसते.' एकजण कमेंट करत म्हणाला की, 'प्रसिद्धी मागायची पद्धत जरा प्रासंगिक होती.' एका ट्रोलरने लिहिले की, 'कॅमेऱ्यासमोरील या परफॉर्मन्ससाठी हिला ऑस्कर देण्यात यावा.' आणखी एका व्यक्तीने टोमणा मारत म्हटले की, 'अरे हे... तू काय केलेस? कचरा फेकून स्वतःच्या कपड्यावरच हात पुसलेस, त्याऐवजी बाटलीतून पाणी ओतून हात धुतले असतेस तर… स्वच्छतेच्या माध्यमातून देशाला सुरक्षित ठेवायला सांगून मलायका स्वतःची स्वच्छता विसरली. स्वतःची देखील काळजी घे.’

WhatsApp channel