बॉलिवूडची 'खल्लास गर्ल' अर्थात अभिनेत्री ईशा कोप्पीकर ही पती टिमी नारंग यांच्यापासून विभक्त झाली आहे. लग्नाच्या तब्बल १४ वर्षानंतर या जोडीचा घटस्फोट झाला आहे. अभिनेत्रीने ईशा कोप्पीकरने आपल्या मुलांसह टिमीचे घर देखील सोडले होते. आता ईशाचा पती टिमीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
ईशा कोप्पीकर वर्षभरापासूनच पती टिमी नारंग यांच्यापासून दूर झाली होती. मात्र, तरीही त्यांच्या घटस्फोटाबाबतच्या बातम्यांनी सातत्याने आल्या. त्यामुळे खरच घटस्फोट झाला की नाही? याबाबत स्पष्टता नव्हती. आता मात्र, पती टिमी नारंग याने देखील घटस्फोटांच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब केला आहे.
वाचा: बाप-लेकाच्या हळव्या नात्याची हटके कथा! कसा आहे नाना पाटेकरांचा ‘ओले आले’? वाचा...
ईशा कोप्पीकरचा पती टीमीने घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, "जवळपास दीड वर्षे घटस्फोट घ्यायचा की नाही? यावर विचार केला. दरम्यान सर्व विचार करुन आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोट मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यातच घेतला होता. दोघांच्याही सहमतीने आणि विचाराने आम्ही हा निर्णय घेतला होता. आता आम्ही आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मला अजूनही समजले नाही की, लोक आमच्याबाबत एवढे कंफ्युज का आहेत?"
अभिनेत्री ईशा कोप्पीकर शेवटची तामिळ चित्रपट 'आयलान'मध्ये दिसली होती. याआधी ती 'लव्ह यू डेमोक्रेसी', 'अस्सी नब्बे पूर सौ' आणि 'कवचा' या चित्रपटांमध्ये दिसली आहे. 'कंपनी' चित्रपटातील 'बचके तू रहना... खल्लास' या गाण्याने ईशाला बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळाली होती. यानंतर ती 'पिंजर', 'डरना मना है', 'एलओसी कारगिल', 'रुद्राक्ष', 'कृष्णा कॉटेज', 'हम तुम', 'क्या कूल हैं हम', 'डी' आणि 'मैं' या चित्रपटांमध्ये देखील झळकली होती.