Amala Paul Announced Pregnancy:‘भोला’ या चित्रपटात अभिनेता अजय देवगण याच्यासोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्री अमला पॉल हिने चाहत्यांसोबत तिची गुडन्यूज शेअर केली आहे. सोशल मीडियावर बेबी बंपचे फोटो शेअर करून तिने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच अमला पॉल हिने आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली होती. आता तिने ही आनंदाची बातमी शेअर करून सगळ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. आपण आई होणार असल्याची आनंदाची बातमी शेअर करत तिने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
दोन महिन्यांपूर्वीचअभिनेत्री अमला पॉल हिने प्रियकर जगत देसाईयाच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. तिच्या लग्नाच्या बातमीनेही चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. कोणताही गाजावाजा न करता अभिनेत्री लग्नबंधनात अडकली होती. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आता तिने आणखी एक आनंदाची बातमी दिल्याने अभिनेत्री चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने तिच्या प्रेग्नन्सीची बातमी देणारी एक खास पोस्ट शेअर केली आहे, ज्यावर चाहते आणि सेलिब्रिटी प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.
अनेकांनी तिच्या या पोस्टवर कमेंट करत अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत. अमला पॉलने पती जगत देसाईसोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. अभिनेत्रीने या फोटोंसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुझ्यासोबतीने मला कळलं की,१ अधिक १ तीन असू शकतात.’ या पोस्टवर चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
गतवर्षी६ नोव्हेंबर रोजी अमला पॉल हिने तिच्या प्रियकराशी दुसरे लग्न केले होते. यापूर्वी तिने अभिनेता एएल विजयसोबत लग्न केले होते. मात्र, त्यांचेहे नाते अवघे तीन वर्षे टिकले. यानंतर दोघांनीही घटस्फोट घेतला होता. यानंतर अभिनेत्रीने तिच्या दुसर्या लग्नाची घोषणा एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे केली होती. तिच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरले होते. साऊथच्या अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये अमला पॉल हिचा समावेश आहे.
संबंधित बातम्या