मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Chala Hawa Yeu Dya: ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाला मोठा धक्का! ‘कॅप्टन ऑफ द शीप’ शोमधून बाहेर पडणार?

Chala Hawa Yeu Dya: ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाला मोठा धक्का! ‘कॅप्टन ऑफ द शीप’ शोमधून बाहेर पडणार?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 21, 2024 04:56 PM IST

Chala Hawa Yeu Dya Nilesh Sable: ‘चला हवा येऊ द्या’ या शोचा ‘कॅप्टन ऑफ द शीप’ म्हटला जाणारा अभिनेता-लेखक-निर्माता निलेश साबळे या शोमधून बाहेर पडणार असल्याचे बोलले जात आहे.

Chala Hawa Yeu Dya Nilesh Sable
Chala Hawa Yeu Dya Nilesh Sable

Chala Hawa Yeu Dya Nilesh Sable: मराठी मनोरंजन विश्वात ‘चला हवा येऊ द्या’ या कथाबाह्य कार्यक्रमाने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांना खळखळवून हसवण्याचे काम केले होते. मात्र, आता या शोच्या चाहत्यांना एक मोठा धक्का बसणार आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या शोचा ‘कॅप्टन ऑफ द शीप’ म्हटला जाणारा अभिनेता-लेखक-निर्माता निलेश साबळे या शोमधून बाहेर पडणार असल्याचे बोलले जात आहे. नुकतीच निलेश साबळे याने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यात त्याने आपण ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून ब्रेक घेणार असल्याचे म्हटले आहे. गेल्या १० वर्षात पहिल्यांदाच निलेश साबळे सुट्टीवर जाणार आहे. या कार्यक्रमातून बाहेर पडण्यामागे तब्येतीचे कारण असल्याचे त्याने म्हटले आहे.

एका प्रसिद्ध वृत्त वाहिनीशी बोलताना निलेश साबळे म्हणाला की, ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम मी सोडला असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, सध्या हा कार्यक्रम चार-पाच महिन्यांच्या गॅपवर चालला आहे. चॅनलने ठरवलं तर, हा लोकप्रिय कार्यक्रम पुन्हा सुरू होऊ शकतो. तब्येतीच्या कारणाने मी आता थोडे दिवस या कार्यक्रमातून बाहेरच असेन’.

Viral Video: ‘असं वाटलं आता मिळणारच नाही’; सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकल्यानंतर शाहरुख खान भावूक!

शोचा टीआरपीही घसरू लागला

गेल्या काही काळापासून ‘चला हवा येऊ द्या’ या शोमागे टीआरपीचं शुक्लकाष्ट लागलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा शो टीआरपीमध्येही घसरू लागला आहे. मात्र, आता निलेश साबळे या कार्यक्रमातून बाहेर पडणार असल्याचे समोर आल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून निलेश साबळे यात अभिनेता-लेखक-दिग्दर्शक आणि निर्माता अशा चारही बाजू सक्षमपणे संभाळत आहे. मात्र, आता तो सुट्टीवर जाणार आहे. तर, दुसरीकडे हा शो देखील चार-पाच महिन्यांसाठी गॅपवर जाणार आहे. या शोमधील आणखी काही कलाकार एक्झिट घेणार असल्याचे कळते आहे.

‘हे’ कलाकारही बाहेर पडणार?

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील अभिनेत्री श्रेया बुगडे आणि अभिनेता कुशल बद्रिके हे देखील बाहेर पडणार असल्याचे बोलले जात आहे. कुशल बद्रिके लवकरच एका हिंदी कॉमेडी शोमध्ये झळकणार आहे. त्याचा ‘मॅडनेस मचायेंगे’ हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या शोचा एक प्रोमो त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. कुशल बद्रिकेचा हा नवा शो कपिल शर्माच्या शोची जागा घेणार आहे.

IPL_Entry_Point