Suniel Shetty On KL Rahul Trolls: सोशल मीडियावर सेलिब्रिटींना ट्रोल करण्याची अनेक प्रकरणं नेहमीच समोर येत असतात. कधीकधी सेलिब्रिटी यावर प्रतिक्रिया देतात, तर कधी ते मुद्दामहून यावर बोलणं टाळतात. केवळ मनोरंजन विश्वच नाही, तर सगळ्याच क्षेत्रातील सेलिब्रिटींना हा अनुभव येतो. क्रिकेटर केएल राहुल याला ट्रोल केल्यानंतर आपल्याला कसं वाटतं यावर अभिनेता सुनील शेट्टी पहिल्यांदाच बोलला आहे. अभिनेता सुनील शेट्टी याने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुनील शेट्टी याची लाडकी लेक अथिया शेट्टी ही क्रिकेटपटू केएल राहुल याच्यासोबत विवाह बंधनात अडकली आहे. तर, सासरेबुवा झालेला अभिनेता सुनील शेट्टी आता आपल्या जावयाला ट्रोल करणाऱ्यांना सुनावताना दिसला आहे.
नात्याने जरी ते जावई आणि सासरे असले, तरी सुनील शेट्टी आणि केएल राहुल यांच्यात अगदी मैत्रीचं नातं आहे. दोघेही एकमेकांविषयी भरभरून बोलताना दिसतात. नुकतीच सुनील शेट्टी याने माध्यमांना एक मुलाखती दिली होती, यात त्याने केएल राहुलच्या ट्रोलिंगवर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना सुनील शेट्टी म्हणाला की, 'जेव्हा कुणी केएल राहुलला ट्रोल करतं, तेव्हा मला खूप वाईट वाटतं. राहुलला जेव्हा कुणी बरंवाईट बोलतं तेव्हा, राहुल आणि अथियापेक्षाही जास्त मला वाईट वाटतं. पण प्रत्येकवेळी राहुल माझी समजूत काढतो. तो म्हणतो की, पापा तुम्ही या सगळ्याची काळजी करू नका. या गोष्टी मनावर घेऊ नका. या सगळ्यांना उत्तर माझी बॅट देईल.'
पुढे सुनील शेट्टी म्हणाला की, 'मी क्रिकेटमध्ये खूपच अंधश्रद्धाळू आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. राहुल जेव्हा जेव्हा मैदानात येतो, तेव्हा मी खूप घाबरून जातो. शेवटी तो माझाही मुलगा आहे. त्याने मैदान जिंकावे असे मला नेहमीच वाटते. पण, जेव्हा मी त्याच्या डोळ्यात पाहतो, तेव्हा मला जाणवते की, ही गोष्ट किती मोठी आहे. जर तुमची मुलं चांगली कामगिरी करू शकली नाही, तर पालक म्हणून तुम्हीही खूप काळजीत पडता. मला माहित आहे की, राहुल संपूर्ण जगासाठी एक मोठा क्रिकेट खेळाडू आहे. पण, मी नेहमीच त्याला माझ्या मुलाप्रमाणेच पाहतो.'
संबंधित बातम्या