गरीबी इतकी की खिचडी पाणी मिसळून खाल्ली, आडनावही सोडून दिलं! रवी किशननं काय काय भोगलं?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  गरीबी इतकी की खिचडी पाणी मिसळून खाल्ली, आडनावही सोडून दिलं! रवी किशननं काय काय भोगलं?

गरीबी इतकी की खिचडी पाणी मिसळून खाल्ली, आडनावही सोडून दिलं! रवी किशननं काय काय भोगलं?

Jan 03, 2025 04:49 PM IST

Actor Ravi Kishan Struggle : अभिनेता रवी किशन सध्या मनोरंजन विश्वात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. त्याच्या अनेक भूमिका गाजताना दिसत आहेत. मात्र, त्याने कधीकाळी त्याने अतिशय हालखीची परिस्थिती पाहिली होती.

रवि किशन
रवि किशन

Actor Ravi Kishan Struggle : अभिनेता रवी किशन याने मनोरंजन सृष्टीत आपलं खास स्थान निर्माण केलं आहे. तो सध्या राजकारणातही आपलं नाव गाजवत आहेत. एका पॉडकास्टदरम्यान त्याने आपल्या आयुष्यातील गरिबीच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला.  त्याच्या आयुष्यात एक काळ असा आला होता की, जेव्हा ते खिचडीतही पाणी मिसळून खात होते. रवी किशन म्हणाला की, आता त्याच्याकडे पैशांची कमतरता नाही, तरीही तो मोठ्या हॉटेल्समध्ये महागडे जेवण मागवू शकत नाही. त्याला आपल्या नावातून शुक्ला हे आडनाव का काढावे लागले, हेही त्याने यावेळी सांगितले.

शुभंकर मिश्रा यांना दिलेल्या मुलाखतीत रवी किशनने आपल्या गरिबीच्या दिवसांच्या आठवणी सांगितल्या. ‘मी मातीच्या झोपडीत राहायचो. आमच्यावर भरपूर जबाबदाऱ्या होत्या, शेती गहाण ठेवली होती. मी खूप गरिबी पाहिली आहे. इतकी गरीबी पाहिली की, थोडीशी खिचडी पाणी मिसळून आम्ही १२ जण खायचो.’ 

खूप अपमान सहन केला!

रवी किशन यांनी मुंबईत येण्याच्या दिवसांची ही आठवण सांगितली. त्याने सांगितले की, तो मुंबईत आला तेव्हा, चहा आणि वडापाव खाऊन राहत होता आणि १५ वर्षे त्याला इंडस्ट्रीत योग्य मानधन देखील मिळत नव्हते. रवी म्हणाला की, ‘या काळात माझा खूप अपमान झाला आहे. लोकांना एक-दोनदा अपमान सहन करावा लागतो. मी मात्र हजारो वेळा याचा अनुभव घेतला आहे. या सगळ्यामुळे रवी किशन आज जे आहे ते बनला आहे.’

दुसऱ्या जातीची असल्याने आईनेही नकार दिला होता! 'सैराट' फेम 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड पाहिलीत का?

का हटवले आडनाव?

रवी किशन याचे आडनाव शुक्ला आहे. मात्र, आजघडीला लोक त्याला केवळ रवी किशन म्हणूनच ओळखतात. त्याने आपल्या नावतून आडनाव का काढून टाकले यामागे देखील एक किस्सा आहे. रवी किशन म्हणाला की, 'मला शुक्ला आडनावाने काम मिळत नव्हते. त्यावेळी पैसे कमावणे ही सर्वात मोठी गरज होती, त्यामुळे आडनावाची चिंता केली नाही. माझं नाव रवी किशन शुक्ला होतं. आता सौरभ शुक्ला, त्रिपाठी आणि बाजे आहेत, पण तेव्हा तसं नव्हतं. मनोरंजन विश्वात नावाला खूप महत्त्व होतं.

आजही खिचडी खातो!

रवी किशन म्हणाला की, आजही जेव्हा तो एखाद्या ७ स्टार हॉटेलमध्ये जातो, तेव्हा त्याला महागडे जेवण मागवता येत नाही. कोणी पैसे देत असेल, तरी तो महागडे जेवण घेत नाही. तो म्हणाला की, ‘मी अजूनही खिचडी मागवतो. मी अजूनही कपडे धुण्यासाठी लाँड्रीमध्ये द्यायला कचरतो. मला वाटते की, मी ते घरी धुवू शकेन. ती गरिबी आजही माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. तो मध्यमवर्गीय रवी किशन आजही मला सोडून गेलेला नाही.’

रवी किशन म्हणाला की, तो स्वतःवर पैसे खर्च करण्यासाठी कचरतो. पण, आपल्या कुटुंबातील सदस्यांना मात्र कधीच अडवत नाही. ते ज्या काही लक्झरी वस्तू खरेदी करतात, त्यासाठी सहज पैसे देतो. पण, त्याला स्वत:वर पैसे खर्च करता येत नाहीत. त्याचे कुटुंबीय त्याच्यासाठी महागड्या वस्तू विकत घेतात.

Whats_app_banner