Actor Ranveer Singh Ad With Johnny Sins: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह पुन्हा एकदा त्याच्या नव्या कारनाम्यामुळे चर्चेत आला आहे. कधी हटके फॅशन, तर कधी न्यूड फोटोशूट या सगळ्यामुळेच अभिनेता रणवीर सिंह नेहमीच चर्चेत राहिला आहे. मात्र, आता त्याने सगळ्यांनाच एक आश्चर्याचा धक्का दिला आहे. अभिनेता रणवीर सिंहने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक जाहिरात व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर सिंह एका प्रसिद्ध पॉर्न स्टारसोबत झळकला आहे. रणवीर सिंहची ही जाहिरात एखाद्या टीव्ही मालिकेप्रमाणे बनवण्यात आली आहे, ज्यामध्ये प्रसिद्ध अडल्ट फिल्म अभिनेता जॉनी सिन्स देखील दिसत आहे. या जाहिरातीचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
रणवीर सिंह आणि जॉनी सिन्स यांची ही जाहिरात लैंगिक समस्यांवरील औषधासाठी बनवण्यात आली आहे. या जाहिरातीचे शूटिंग एखाद्या मालिकेत दिसणाऱ्या नाट्यमय दृश्याप्रमाणे चित्रित करण्यात आले आहे. खुद्द अभिनेता रणवीर सिंह याने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर आता नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. या जाहिरातीवर लोकांच्या खूप प्रतिक्रिया येत आहेत.
रणवीर सिंहच्या जाहिरातीत जॉनी सिन्सला पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर, दुसरीकडे काही लोक मात्र या व्हिडीओवर मजेशीर कमेंट करत आहेत. या व्हिडीओवर कमेंट करत एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, ‘जॉनी भाई, इथून पळून जा, नाहीतर हे लोक तुला बिघडवतील.’ तर, एकाने लिहिले की, ‘माझा यावर विश्वास बसत नाहीये, की रणवीर सिंह ही जाहिरात करत आहे.’
आणखी एकाने लिहिले की, ‘आता त्याला ऑस्कर देखील द्या. इतका अप्रतिम अभिनय आणि पटकथा.’ दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘चला, कुणीतरी या विषयावर बोलण्याचे धाडस दाखवले आहे, त्याचे कौतुक वाटते.’ दुसऱ्याने लिहिले की, ‘रणवीर भाई, तुम्ही कोणत्या लाईनमध्ये आला आहात?’ आणखी एकाने लिहिले की, ‘ही जाहिरात पाहिल्यानंतर मी १५ मिनिटे हसत राहिलो.’ एकाने लिहिले, ‘काय क्रिएटिव्ह जाहिरात केली आहेस भाऊ.’ ‘लोक आजकाल जाहिराती बनवण्यासाठी काय करत आहेत, त्यांनी जॉनी भाईला औषध विकायला आणले आणि तेही रणवीर सिंहसोबत! व्वा भाऊ व्वा!’, अशा कमेंट देखील पाहायला मिळत आहेत.
संबंधित बातम्या