मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rakesh Bedi: आर्मी ऑफिसर सांगून लावला ७५ हजारांचा चुना; 'गदर २' फेम अभिनेता फ्रॉडचा शिकार

Rakesh Bedi: आर्मी ऑफिसर सांगून लावला ७५ हजारांचा चुना; 'गदर २' फेम अभिनेता फ्रॉडचा शिकार

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 02, 2024 03:04 PM IST

Fraud With Rakesh Bedi: 'गदर २' फेम अभिनेत्याला तब्बल ७५ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणाची तक्रार आता अभिनेत्याने पोलिसांकडे केली आहे.

Fraud With Rakesh Bedi
Fraud With Rakesh Bedi

Fraud With Rakesh Bedi: टीव्ही मालिका आणि चित्रपट अभिनेते राकेश बेदी नुकतेच फसवणुकीचे शिकार ठरले आहेत. 'गदर २' फेम अभिनेत्याला तब्बल ७५ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणाची तक्रार आता अभिनेत्याने पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी सदर भामट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मुलाखतीत या भामट्या व्यक्तीने आपण लष्करी अधिकारी असल्याचे भासवून अभिनेते राकेश बेदी यांच्याकडून हजारो रुपये उकळले आहेत. आपल्यासोबत हा प्रकार नेमका कसा घडला, याची माहिती अभिनेत्याने नुकतीच दिली आहे.

या संदर्भात मीडियाशी बोलताना राकेश बेदी म्हणाले की, त्यांनी या फसवणुकीची तक्रार ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये केली आहे. वेळीच ही गोष्ट लक्षात आल्याने त्यांना भविष्यात होणारे मोठे नुकसान टाळता आले, असे देखील त्यांनी म्हटले आहे. अशा प्रकारे खोटं सांगून लोकांची फसवणूक करणार्‍या या फसव्या भामट्या लोकांपासून सगळ्यांनीच दूर राहावे, असे आवाहन देखील त्यांनी चाहत्यांना केले आहे.

Tharala Tar Mag 2nd Dec: सायली सोडून जाणार अर्जुनचं घर? 'ठरलं तर मग' रंजक वळणावर!

कशी झाली फसवणूक?

सदर फ्रॉड नेमका कसा झाला याबद्दल बोलताना राकेश बेदी यांनी म्हटले की, त्यांना एका व्यक्तीचा फोन आला होता. या व्यक्तीने आपण लष्करी अधिकारी असल्याचे सांगितले होते. त्यांच्या पुण्यातील फ्लॅटमध्ये आपल्याला रस असल्याचे सांगितले. मात्र, आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे अभिनेत्याच्या लक्षात येईपर्यंत त्या व्यक्तीने त्यांच्या खात्यातून ७५ हजार रुपये स्वतःच्या बँक खात्यात ट्रान्सफर करून घेतले होते.

राकेश बेदी म्हणाले की, असे लोक या सर्व गोष्टी रात्रीच्या वेळी करतात. जेणेकरून कोणी यांच्या फ्रॉडचे बळी शिकार झाले आणि त्यांनी तक्रार करण्याचा विचार केला, तर ते तसे करू शकणार नाहीत. आणि दुसऱ्या दिवशी व्यक्ती पोलीस स्टेशनला पोहोचेल, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. राकेश बेदी यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या खात्याशी संबंधित सर्व तपशील पोलिसांना दिले आहेत. त्या व्यक्तीचा खाते क्रमांकही त्यांनी पोलिसांना दिला आहे. अनेक दिवसांपासून असे प्रकार घडत असल्याचे पोलिसांनी देखील म्हटले आहे.

WhatsApp channel

विभाग