मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rajnikant in Ayodhya: ‘मी अयोध्येला पुन्हा येणार’; सुपरस्टार रजनीकांत बेहद्द खुष

Rajnikant in Ayodhya: ‘मी अयोध्येला पुन्हा येणार’; सुपरस्टार रजनीकांत बेहद्द खुष

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 22, 2024 08:14 PM IST

Rajinikanth At Ayodhya: नुकताच रजनीकांत यांनी अयोध्यातील राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्याला हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी केलेले वक्तव्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

**EDS: GRAB VIA PTI VIDEO** Ayodhya: Actor Rajinikanth at the Ram Mandir ahead of the consecration ceremony, in Ayodhya, Monday, Jan. 22, 2024. (PTI Photo)(PTI01_22_2024_000078B)
**EDS: GRAB VIA PTI VIDEO** Ayodhya: Actor Rajinikanth at the Ram Mandir ahead of the consecration ceremony, in Ayodhya, Monday, Jan. 22, 2024. (PTI Photo)(PTI01_22_2024_000078B) (PTI)

आज संपूर्ण देश हा राममय झाला आहे. एक मोठ्या संघर्षानंतर रामजन्मभूमीत पुन्हा एकदा जल्लोषात प्रभू रामाचे स्वागत होत असल्यामुळे देशभरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. आयोध्येत प्रभू श्रीरामाचा मूर्ती प्राणप्रतिष्ठान सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला देशातील दिग्गज लोक उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी देखील हजेरी लावली. त्यानंतर आयोध्येतून निघताना रजनीकांत यांनी प्रतिक्रिया दिली.

ट्रेंडिंग न्यूज

रजनीकांत यांनी 'एएनआय' या वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी रामाची मूर्ती ही अतिशय सुंदर असून दरवर्षी आयोध्येला येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. "या ऐतिहासिक घटनेचा साक्षिदार होणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. प्रभू श्रीरामांची मूर्ती अतिशय सुंदर आहे. मी लवकरच पुन्हा भेट देईन" असे रजनीकांत यांनी म्हटले.
वाचा: अभिनेत्री नोरा फतेही झाली डीपफेकची शिकार! सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली...

यापूर्वी रजनीकांत यांचा आयोध्येमधील एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये अयोध्येमध्ये त्यांची भेट अभिनेते अनुपम खेर यांच्याशी झाल्याचे पाहायला मिळाले. अनुपम खेर यांनी स्वत: हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘आज खूप दिवसांनी मी माझ्या जुन्या मित्राला, रजनीकांत यांना श्री रामजन्मभूमी येथे भेटलो. जय श्री राम....’ असे कॅप्शन दिले होते. चाहत्यांसाठी हा फोटो सुखद धक्काच होता.

अनुपम खेर काश्मिरी पंडितांचे प्रतिनिधित्व करणार

अयोध्येला रवाना होण्यापूर्वी, अनुपम खेर यांना मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. आपल्या मनातील भावना व्यक्त करताना ते म्हणाले की, ‘खूप छान वाटत आहे. आपण सर्वांनी या दिवसाची खूप दिवसांपासून वाट पाहिली आहे. जय श्री राम.’ यावेळी अनुपम खेर यांनी एक मोठं वक्तव्य देखील केलं. अयोध्येत जाऊन संपूर्ण काश्मिरी पंडित समाजाचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे अनुपम खेर यांनी यावेळी म्हटले.

WhatsApp channel
विभाग