मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘दामले निवृत्त व्हा!’; चाहत्याच्या खोचक कमेंटला अभिनेता प्रशांत दामले यांचं चोख उत्तर! म्हणाले...

‘दामले निवृत्त व्हा!’; चाहत्याच्या खोचक कमेंटला अभिनेता प्रशांत दामले यांचं चोख उत्तर! म्हणाले...

Jun 13, 2024 10:43 AM IST

‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकाच्या तालमीचा व्हिडीओ प्रशांत दामले यांनी फेसबुक अकाउंटवरून शेअर केला होता. त्यांच्या व्हिडीओवर आलेल्या अनेक कमेंट्सनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

चाहत्याच्या खोचक कमेंटला अभिनेता प्रशांत दामले यांचं चोख उत्तर!
चाहत्याच्या खोचक कमेंटला अभिनेता प्रशांत दामले यांचं चोख उत्तर!

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालणारे अभिनेते म्हणून प्रशांत दामले यांचे नाव आवर्जून घेतले जाते. ‘रंगभूमीचा बादशाह’ असं बिरूद मिरवणारे प्रशांत दामले गेली ४ दशकं प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. मराठी नाट्यसृष्टीतल्या दिग्गज कलाकारांच्या यादीत प्रशांत दामले यांचे नाव आवर्जून घेतले जाते. मराठी रंगभूमीसह चित्रपटसृष्टी आणि मालिका विश्वातही प्रशांत दामले यांनी आपलं नाव गाजवलं. आजही प्रशांत दामले प्रेक्षकांच्या मनावर तितकी जादू करताना दिसतात. गेल्या ४० वर्षांपासून मनोरंजन विश्वात अविरतपणे कार्य करणारा हा रंगमंचावरचा बादशहा नाटक आणि रंगमंचला जोडून ठेवणारा एक मोठा दुवा आहे. अभिनेते असण्याबरोबरच प्रशांत दामले हे एक गायक आणि नाट्यनिर्माते देखील आहेत. आपल्या विनोदी अभिनयाने मराठी नाटक आणि चित्रपटसृष्टीत त्यांनी एक वेगळी हक्काची जागा निर्माण केली आहे.

दरम्यान आता वसंत सबनीस यांनी लिहिलेलं प्रशांत दामले यांचे ‘गेला माधव कुणीकडे’ हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहे. या नाटकामधून प्रशांत दामले आणि विनय येडेकर ही जोडी पुन्हा एकदा धमाल करायला सज्ज झाली आहे. ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकाने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं होतं. आता पुन्हा एकदा हे नाटक रंगमंच गाजवायला सज्ज झालं आहे, हे कळताच प्रेक्षक देखील आतुर झाले आहेत. काही वर्ष या नाटकांना ब्रेक घेतला होता. मात्र, रसिक प्रेक्षकांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘गेला माधव कुणीकडे’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

पुढच्या चारच दिवसात हे नाटक रंगमंचावर सादर होणार आहे. कलाकार तालमीत रंगलेले देखील दिसत आहेत. कलाकारांनी या नाटकाच्या तालमी जोरदार सुरू केल्या आहेत. याचाच एक व्हिडीओ प्रशांत दामले यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून शेअर केला होता. त्यांच्या व्हिडीओवर आलेल्या अनेक कमेंट्सनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या नाटकाबाबत चाहते देखील आतुर आणि उत्सुक असल्याचं दिसतंय. मात्र, काही खोडकर नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंट करत प्रशांत दामले यांच्यावर टीका करण्याचा देखील प्रयत्न केला आहे.

चाहत्याची खोचक प्रतिक्रिया

एका व्यक्तीने प्रशांत दामले यांच्या या पोस्टवर कमेंट करत ‘दामले आता निवृत्त व्हा!’ असं म्हटलं आहे. या खोचक कमेंटवर प्रशांत दामले यांनी देखील चोख उत्तर दिलं आहे. सोशल मीडिया युजरच्या या कमेंटवर प्रशांत दामले देखील प्रतिक्रिया देत म्हणाले ‘का हो असं का म्हणताय?’. यावर नेटकऱ्याने पुन्हा कमेंट करत म्हटलं की, ‘रसिक प्रेक्षक काहीच बोलत नसले, तरी आता तुमचा कंटाळा आला आहे. तुमचा रवी शास्त्री होऊ देऊ नका.’ यावर प्रशांत दामले यांनी कमेंट करत म्हटलं की, ‘रसिक प्रेक्षक बोलत नाहीत हे खरं आहे. पण मला त्यांच्या मेसेज वरून कळतं की, कधी थांबायचं. मला अंदाज येतो. मात्र, सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद’, असं सडेतोड उत्तर त्यांनी दिलं आहे.

WhatsApp channel