पंकज त्रिपाठीवर कोसळला दुःखाचा डोंगर! रस्ते अपघातात गमावली जवळची व्यक्ती; बहीणही गंभीर जखमी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  पंकज त्रिपाठीवर कोसळला दुःखाचा डोंगर! रस्ते अपघातात गमावली जवळची व्यक्ती; बहीणही गंभीर जखमी

पंकज त्रिपाठीवर कोसळला दुःखाचा डोंगर! रस्ते अपघातात गमावली जवळची व्यक्ती; बहीणही गंभीर जखमी

Published Apr 21, 2024 09:50 AM IST

'मर्डर मुबारक'या चित्रपटाला मिळालेल्या यशाचा आनंद घेत असतानाच पंकज त्रिपाठी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पंकज त्रिपाठीवर कोसळला दुःखाचा डोंगर! रस्ते अपघातात गमावली जवळची व्यक्ती; बहीणही गंभीर जखमी
पंकज त्रिपाठीवर कोसळला दुःखाचा डोंगर! रस्ते अपघातात गमावली जवळची व्यक्ती; बहीणही गंभीर जखमी

बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्याबद्दल एक दुःखद बातमी समोर येत आहे. अभिनेत्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पंकज त्रिपाठी यांचा भावोजी राजेश तिवारी उर्फ ​​मुन्ना तिवारी याचा मृत्यू झाला आहे, तर अभिनेत्याची बहीण सरिता तिवारी हिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंकज त्रिपाठी यांचे कुटुंब शनिवारी, २० एप्रिल रोजी एका रस्ता अपघाताचे बळी ठरले आहे. अपघातानंतर लगेचच अभिनेत्याची बहीण आणि तिचा पती यांना धनबाद मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले, जेथे उपचारादरम्यान अभिनेत्याच्या भावोजीचा मृत्यू झाला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी संध्याकाळी४ वाजण्याच्या सुमारास दिल्ली-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग-२वर निरसा मार्केटजवळ हा अपघात झाला. अपघात झाला तेव्हा पंकज त्रिपाठी यांचा बहिणीचा नवरा राजेश कार चालवत होता, तर त्यांची पत्नी आणि अभिनेत्याची बहीण सरिता राजेश यांच्या बाजूच्या सीटवर बसल्या होत्या. दोघेही कारने गोपालगंजमार्गे कोलकात्याच्या दिशेने जात होते.वृत्तानुसार, ते निरसा मार्केटमध्ये पोहोचताच त्यांची कार दुभाजकावर आदळली, ज्यामुळे कारचा पुढील भाग चक्काचूर झाला.

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन यांनी साजरा केला लग्नाचा वाढदिवस! शेअर केला क्युट फोटो

पंकज त्रिपाठी यांच्या बहिणीची प्रकृती गंभीर

या अपघातात पंकज त्रिपाठी यांची बहीण आणि तिचा पती गंभीर जखमी झाले. पोलिसांना अपघाताची माहिती घटनास्थळी देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून राजेश आणि सरिता यांना उपचारासाठी धनबाद मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान राजेशला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर सरिताची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.पंकज त्रिपाठी यांच्या बहिणीच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे, त्याशिवाय त्या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांची गंभीर प्रकृती पाहून डॉक्टरांनी सरिताला आयसीयूमध्ये ठेवले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पंकज त्रिपाठी यांच्या बहिणीचे पती राजेश तिवारी हे भारतीय रेल्वेत कर्मचारी होते.ही दुःखद घटना कळल्यानंतरआता पंकज त्रिपाठीही धनबादला पोहोचणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पंकज त्रिपाठी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर

पंकज त्रिपाठी यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, ते गेल्या महिन्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या'मर्डर मुबारक' या रहस्यमय विनोदी चित्रपटात झळकले होते. या चित्रपटात सारा अली खान, विजय वर्मा, करिश्मा कपूर यांसारखे स्टार्सही त्याच्यासोबत दिसले होते. त्यांचा हा चित्रपट लोकांना खूप आवडला. या चित्रपटाला मिळालेल्या यशाचा आनंद घेत असतानाच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

Whats_app_banner