सध्या संपूर्ण भारत हा रामभक्तीत लीन झाला आहे. आज आयोध्येत सुरु असलेल्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची गेल्या कित्येक वर्षांपासून सर्वजण वाट पाहात होते. आज अखेर भारतीयांचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. आयोध्येत प्रभू श्रीरामाचा मूर्ती प्राणप्रतिष्ठान सोहळा पार पडत आहे. या सोहळ्याला सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वांनी हजेरी लावली. दरम्यान, अभिनेते मनोज जोशी यांनी देखील हजेरी लावली आणि त्यावर प्रतिक्रिया दिली.
मनोज जोशी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी या व्हिडीओमध्ये ते राम रक्षा स्तोत्र म्हणताना दिसत आहेत. या व्हिडीओला त्यांनी, "श्री राम: शरणं मम ।।" असे कॅप्शन दिले आहे.
वाचा: प्रेम आणि मैत्रीचा सुंदर प्रवास; 'मुसाफिरा'चा ट्रेलर प्रदर्शित
राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्याचे वर्णन शब्दात करु शकत नाहीत असे म्हणते, "मेरे राम आए हैं, जे लोक रामाला आपलं मानतात ते सगळेच लोक आज भावूक झाली आहेत. या सोहळ्याचे कसे वर्णन करु? माझ्याकडे शब्द नाहीयेत. आपण प्रत्यक्ष ईश्वराला आपण जेव्हा पाहतो, तेव्हा आपल्याला काही सुचत नाही. तशीच भावना इथे असणाऱ्या प्रत्येक माणसाची झाली आहे. तसेच टिव्हीवरुन हा सोहळा बघत असलेल्या प्रत्येक व्यक्तीची भावना देखील तशीच आहे. यासाठी शब्द नाहीयेत."
राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, विकी कौशल, कतरिना कैफ, आलिया भट्ट, रणबीर कपूर, माधुरी दीक्षित, कंगना रणौत, आयुष्मान खुराना, जॅकी श्रॉफ, राम चरण,रोहित शेट्टी आणि दिपिका चिखलियाया कलाकारांनी हजेरी लावली. तसेच गायक सोनू निगम आणि शंकर महादेवन यांनी या सोहळ्यासाठी खास गाणी गायली आहेत.
हे मंदिरत तीन मजली असून मुख्य मंदिरात जाण्यासाठी भाविकांना पूर्वेकडून ३२ पायऱ्या चढाव्या लागतील. पारंपारिक नगर शैलीत बांधलेले मंदिर परिसर ३८० फूट लांब (पूर्व-पश्चिम दिशा), २५० फूट रुंद आणि १६१ फूट उंच असेल. मंदिराचा प्रत्येक मजला २० फूट उंच असेल आणि त्याला एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील.