मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jeetendra Marathi Movie: जितेंद्र यांचा पहिला मराठी चित्रपट ‘मोसंबी नारंगी’ पाहण्याची झक्कास संधी! कधी आणि कुठे? वाचा...

Jeetendra Marathi Movie: जितेंद्र यांचा पहिला मराठी चित्रपट ‘मोसंबी नारंगी’ पाहण्याची झक्कास संधी! कधी आणि कुठे? वाचा...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 12, 2024 01:41 PM IST

Actor Jeetendra Marathi Movie: अभिनेते जितेंद्र यांचा पहिला वहिला मराठी चित्रपट ‘मोसंबी नारंगी’ रसिक प्रेक्षकांना घर बसल्या बघण्याची संधी मिळणार आहे.

Actor Jeetendra Marathi Movie
Actor Jeetendra Marathi Movie

Actor Jeetendra Marathi Movie: बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करून चंदेरी दुनियेत अधिराज्य गाजवणाऱ्या सुपरस्टार जितेंद्र यांनी मराठी मनोरंजन विश्वात देखील पदार्पण केले होते. ‘मोसंबी नारंगी’ या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. आता जितेंद्र यांचा पहिला वहिला मराठी चित्रपट ‘मोसंबी नारंगी’ रसिक प्रेक्षकांना घर बसल्या बघण्याची संधी मिळणार आहे. आजपासून (१२ जानेवारी) हा चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर पहायला मिळणार आहे.

आपल्या दमदार अभिनयाने हिंदी मनोरंजन विश्व गाजवणारे अभिनेते जितेंद्र यांनी मराठीतही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. त्यांच्या ‘नारंगी मोसंबी’ या चित्रपटाची कथा देखील हटके होती. या चित्रपटाच्या कथेत बैलांच्या शर्यतीत हरल्याने मंबाजी सुडाच्या भावनेने रघुजीच्या कुटुंबावर हल्ला करतो. जिथे रघुजीच्या दोन मुली मोसंबी आणि नारंगी एकमेकींपासून वेगळ्या होतात. याच हल्ल्यात रघुजीची पत्नी मरण पावते आणि त्याची स्मरणशक्ती नष्ट होते. बऱ्याच वर्षांनंतर जेव्हा दोन्ही मुली रघुजीकडे परत येतात, तेव्हा काय घडते हे चित्रपटात पहायला मिळणार आहे.

Merry Christmas Review: प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरलाय का ‘मेरी ख्रिसमस’? वाचा रिव्ह्यू...

मराठी चित्रपटसृष्टीला ग्लॅमर दाखवणारी निर्माती-अभिनेत्री म्हणजेच सुषमा शिरोमणी. त्यांचे जवळपास सर्वच चित्रपट सुपरहिट आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या अनेक सुपरस्टार्सना मराठी रुपेरी पडद्यावर आणण्याचा वासाच त्यांनी उचलला होता. त्यांच्या अनेक मसालेदार सुपरहिट चित्रपटांपैकी असलेला दत्ता केशव दिग्दर्शित आणि बॉलिवूड सुपरस्टार जितेंद्र यांचा मराठी पदार्पणाचा हा चित्रपट खूप खास आहे. अभिनेते जितेंद्र यांच्यासोबतच डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, यशवंत दत्त, अशोक सराफ, उषा चव्हाण आणि सुषमा शिरोमणी अभिनित 'मोसंबी नारंगी' हा आठवणीतला चित्रपट आता खास अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर रसिकांना पहायला मिळणार आहे.

‘आजकालच्या नवनवीन कंटेंटमध्ये आपल्या जुन्या आठवणीतील जुने चित्रपट कुठेतरी हरवले आहेत, म्हणूनच त्यांना पुन्हा अल्ट्रा झकासच्या माध्यमातून रसिकांना सादर करतानाचा आनंद गगनात न मावणारा आहे’, असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सीईओ सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

WhatsApp channel

विभाग