मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Imran Khan: उरली अवघी ३ ताटं अन् २ पेले; आलिशान आयुष्य जगणारा आमिर खानचा भाचा झाला कंगाल!

Imran Khan: उरली अवघी ३ ताटं अन् २ पेले; आलिशान आयुष्य जगणारा आमिर खानचा भाचा झाला कंगाल!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 07, 2024 01:18 PM IST

Imran Khan Lost His Property: गेल्या काही वर्षांपासून चित्रपटविश्वातून दूर असलेल्या अभिनेता इम्रान खान याचे आयुष्य आता खूप बदलून गेले आहे.

Actor Imran Khan
Actor Imran Khan

Imran Khan Lost His Property: 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून सगळ्या तरुणींचे मन जिंकणारा अभिनेता इम्रान खान गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपट विश्वापासून दूर आहे. गेल्या काही वर्षांपासून चित्रपटविश्वातून दूर असलेल्या या अभिनेत्याचे आयुष्य खूप बदलून गेले आहे. नुकतीच इम्रान खान याने एक मुलाखत दिली, ज्यात त्याने अनेक खुलासे केले आहेत. यात त्याने म्हटले की, काम नसल्यामुळे त्याला आपला बंगला आणि आलिशान कार देखील विकावी लागली होती.

वोग इंडियाशी बोलताना आमिर खानच्या भाचा अभिनेता इम्रान खान म्हणाला की, 'वर्ष २०१६ पासून मला आयुष्यातील उतरता टप्पा दिसू लागला होता. मी आतून पूर्णपणे खचत चाललो होतो. मात्र, एक चांगली गोष्ट होती, ती म्हणजे मी इंडस्ट्रीत काम करत होतो आणि त्यासाठी मला पैसे मिळत होते. त्यामुळे मी ३० वर्षांचा होईपर्यंत मला पैशाची चिंता नव्हती. या दरम्यान, माझे लग्न झाले, मी बाबा झालो होतो आणि मला वाटले की, आता आयुष्य मार्गी लागलं आहे. माझ्यासाठी हे पुरेसे आहे. मला माझ्या मुलीसाठी तिचा बेस्ट बाबा व्हायचं होतं.’

Tharala Tar Mag 7th Feb: अबोल सायलीचं नवं रूप पाहून अर्जुनला बसला गोड धक्का! ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर

इम्रान खान पुढे म्हणाला की, आता त्याचे आयुष्य खूप बदलले आहे. पूर्वी तो पाली हिल येथे एका मोठ्या बंगल्यात राहत होता. आता तो वांद्रे येथील एका छोट्याश अपार्टमेंटमध्ये राहू लागला आहे. आता त्याच्याकडे केवळ स्वयंपाकघरातील ३ प्लेट्स, २ कॉफी मग आणि १ तवा इतकेच समान शिल्लक आहे. उदरनिर्वाहासाठी इम्रानला त्याची फेरारी कार विकावी लागली होती. इम्रान खान आता इतके साधे जीवन जगत आहे की, तो आमिर खानची मुलगी आयरा हिच्या लग्नात त्याचा १० वर्ष जुना सूट घालून गेला होता.

इम्रान खानने अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अवंतिका मलिकसोबत लग्न केले होते. मात्र, दोघेही आता वेगळे झाले आहेत. दोघांनाही एक मुलगी आहे, जिचे नाव इमारा आहे. इमारा कधी आईसोबत तर कधी वडिलांसोबत राहते. तर, इम्रान आता लेखा वॉशिंग्टनला डेट करत आहे. सोशल मीडियावर चाहत्यांच्या आग्रहानंतर इम्रानने आपण कमबॅक करत असल्याचे म्हटले आहे. यासाठी इम्रान खूप मेहनत घेत आहे. तो फिटनेस आणि इतर ट्रेनिंग देखील घेत आहे. २०१५मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कट्टी-बट्टी’ या चित्रपटात इम्रान झळकला होता. या चित्रपटात इमरानसोबत कंगना मुख्य भूमिकेत होती. मात्र, हा चित्रपट फ्लॉप ठरला होता.

WhatsApp channel

विभाग