मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अमिताभ बच्चन यांच्यासारखा चेहरा; मालिका विश्वातही गाजले! अभिनेते फिरोज खान यांच्या निधनामुळे शोककळा

अमिताभ बच्चन यांच्यासारखा चेहरा; मालिका विश्वातही गाजले! अभिनेते फिरोज खान यांच्या निधनामुळे शोककळा

May 24, 2024 10:43 AM IST

'भाभीजी घर पर है' फेमअमिताभ बच्चन यांच्यासारखे दिसणारे अभिनेते फिरोज खान यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

अभिनेते फिरोज खान यांच्या निधनामुळे शोककळा
अभिनेते फिरोज खान यांच्या निधनामुळे शोककळा

टीव्ही विश्वातून पुन्हा एकदा एक अत्यंत दु:खद बातमी आली आहे. 'भाभीजी घर पर है' फेमअमिताभ बच्चन यांच्यासारखे दिसणारे अभिनेते फिरोज खान यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. फिरोज खान हे केवळ त्यांच्या कामासाठीच ओळखले जात नव्हते, तर बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासारखे दिसत असल्याने त्यांना बिग बींचे डुप्लिकेट देखील म्हटले जात होते.

ट्रेंडिंग न्यूज

अमिताभ बच्चन यांच्या मिमिक्री आणि अभिनयामुळे फिरोजने लोकांच्या हृदयात स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले होते. चाहत्यांना त्यांची स्टाईल खूप आवडायची. आता त्यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वांनाच धक्का बसला आहे. अभिनेत्याचे चाहतेच नाही तर'भाभीजी घर पर हैं!' शोची टीम आणि प्रेक्षकही त्यांच्या निधनाने दु:खी झाले आहेत. सोशल मीडियावर सर्वजण त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. फिरोज खान यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे.

हात मोडला तरी ऐश्वर्या एकटीच... अभिषेक बच्चन कुठे गेला? खरंच दोघांमध्ये दुरावा? चाहत्यांना पडलाय प्रश्न

चित्रपट विश्वातही झळकले

कॉमेडी शो'भाबीजी घर पर हैं!'ही मालिकाच नाही तर, त्यांनी चित्रपटांमध्येही आपली प्रतिभा दाखवली आहे.'भाबीजी घर पर हैं!' या कॉमेडी शोमध्ये फिरोजचा नेहमीच सहभाग होता. या मालिकेद्वारे त्यांना ओळख मिळाली होती. या शोशिवाय'जिजाजी छत पर हैं', 'साहेब बीबी और बॉस', 'हप्पू की उलटन पलटन' आणि 'शक्तिमान' सारख्या शोसाठीही फिरोज ओळखले जातात. इतकंच नाही, तर गायक अदनान सामीच्या सुपरहिट गाण्यातील'थोडी सी तू लिफ्ट करा दे'सह अनेक चित्रपटांमधील कामासाठी फिरोजचे कौतुकही झाले आहे.

सोशल मीडियावरही लोकप्रिय

सोशल मीडियावरही फिरोजच्या चाहत्यांची कमी नाही. इंस्टाग्रामवर एका लाखांहून अधिक लोक त्यांना फॉलो करत होते. त्यांच्या सोशल मीडिया व्हिडीओंना चांगले व्ह्यूज मिळत होते. अभिनेते फिरोज खान यांच्या आधी'भाभीजी घर पर हैं!' या मालिकेत'मलखान'ची भूमिका साकारणाऱ्या दीपेश भानचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. दीपेश भानने जगाचा निरोप घेतला, तेव्हाही चाहत्यांचे चेहरे उदास झाले होते. त्यावेळीही अवघ्या इंडस्ट्रीवर शोककळा पसरली होती.

टी-२० वर्ल्डकप २०२४